महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टतर्फे मार्केट यार्डात मतदान जनजागृती अभियान आणि ‘पाणी वाचवा देश वाचवा’ चा संदेश देण्यात आला.
यावेळी अभय संचेती, पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, विजयकांत कोठारी, वालचंद संचेती, अभय संचेती, आदेश खिवंसरा, रिद्धी संचेती, ॲड. गौरी भटेवरा, मनीष संचेती, विजय शिंगवी, प्रकाश दर्डा, सुनील गुंदेचा, सुरेंद्र श्रीश्रीमाळ, हरकचंद मुथा, मकरंद टिल्लू, संपत बोथरा, हरकचंद देसर्डा, सतीश श्रीश्रीमाळ, प्रवीण नहार, किरण छाजेड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मार्केटयार्ड मधील शिवनेरी रस्त्यावर यावेळी रॅली काढण्यात आली. मार्केटयार्डतील विविध व्यापारी नागरिक यावेळी उपस्थित होते. ट्रस्टच्या सदस्यांनी मतदान जनजागृती व्हावी, तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी वाचविण्याचा संदेश देत विविध घोषणा दिल्या.
अध्यक्ष अभय संचेती म्हणाले, सत्य अहिंसा परमो धर्म, जिओ और जीने दो हा संदेश महावीर स्वामींनी दिला आहे. या तत्त्वांनी आम्ही अनुयायी काम करत आहोत. त्यांनी दिलेल्या संदेशावर आम्ही काम करतो. सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे. याच्या माध्यमातून लोकशाही अखंडित राहणार आहे त्यामुळे प्रत्येक मतदाराने मतदान करणे गरजेचे आहे.
सर्वांनी मतदान करणे गरजेचे – लोकशाहीत मतदान महत्त्वाचे आहेत अनेक जण मतदाना दिवशी सुट्टी एन्जॉय करायला जातात त्यांनी तसे न करता मतदान करणे गरजेचे आहे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे त्यामुळे सर्वांनी मतदान करावे. दिवसेंदिवस देशात पाऊस कमी पडत आहे त्यामुळे प्रत्येक दोन तीन वर्षानंतर दुष्काळ पडत आहे सर्वांनी पाण्याची महत्व ओळखावे पाण्याची बचत करून पुढच्या पिढ्या वाचवाव्यात पाणी वाचवले तर देश वाचेल. अभय संचेती, संस्थापक अध्यक्ष, स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्ट