महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : एच.व्ही.देसाई आय हॉस्पीटल, अमनोरा येस फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज यांच्या वतीने अमनोरातील अवंतिका, हाउसकीपींग स्टाफ आणि कामगारांसाठी डोळे तपासणी शिबीर पार पडले. शिबीरामध्ये ७३० जणांची तपासणी आली.
यावेळी ३४२ चष्म्यांचे वाटप आणि ४७ मोतीबिंदुचे निदान झाले आहे. याप्रसंगी एच.व्ही. देसाई आय हॉस्पीटलचे अध्यक्ष राजेश शहा, रोटरी कात्रजचे मिलींद कुलकर्णी, अमनोरा येस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी, गुजराथी बंधु समाजाचे विश्वस्त नैयनेश नंदु उपस्थित होते.
यावेळी जनकल्याण ब्लड बँकेकडून रक्तदान शिबीर आयोजित केले होते. अमनोरा कुटूंबीयांतील २१५ जणांनी रक्तदान केले. राजेश शहा म्हणाले “सध्या मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळयांच्या तक्रारी वाढत आहेत. डोळे तपासणी शिबीर या निमित्ताने गरजुंना वरदान ठरत आहेत.”