महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : जाणीव फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव पुणे सातारा रोड धनकवडी येथे उत्साहात संपन्न झाला.
फाउंडेशनच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम गेली 15 वर्ष महापुरुषांच्या जयंती निमित्त साजरा केला जात आहे. शालेय व लहान मुलांना सर्व राष्ट्रपुरुषांची व महामानव यांचे जीवनावरील पुस्तके मोफत वाटली जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, व खाऊ वाटप केलं जाते. जाणीव फाउंडेशनच्या वतीने 25,000 पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
फक्त जयंतीच्या दिवशी दिखावा न करता वर्षभर आपल्या देशातील महामानव, राष्ट्रपुरुष यांचे विचार पुस्तकांच्या मध्मातून येणाऱ्या पिढीपर्यंत पोचविण्याचे काम फाउंडेशनच्या वतीने करण्यात येते. या वर्षी अनेक सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी महापुरुषांना अभिवादन करुन आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी माजी मुख्याध्यापक भैलुमे व सुप्रसिद्ध गायक सुदाम कुंभार यांनी बहारदार भीमगीते सादर केली. या कार्यक्रमात सोशल 100 फाऊंडेशनचे संचालक गणेश चोरघे यांचा नगरसेवक राणी रायबा भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी ५० शालेय विद्यार्थ्यांना प्रकाश कदम यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास रमेश बापू कोंडे, मिलिंद पन्हाळकर, राजेंद्र बर्गे, दिगंबर डवरी, सचिन भोसले, किशोर आव्हाळे, विजय जाधव, नवनीत अहिरे, अनिल दारवटकर, शामु शिवशरण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन जाणीव फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल काटे यांनी केले तर सूत्रसंचालन कवी गोपाळ कांबळे व आभार अनिल शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी संदीप काळे, किरण साबळे, योगेश मोघे, करण बोडदे, वैभव वांधरे, गणेश हिवरेकर, विनोद शिंदे, परशुराम दुपारगुडे, रवींद्र सोनावणे, विकी शिंदे, रवी कांबळे या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.