शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : प्राणघातक हल्ल्यामधील १८ महिन्यापासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलिसानी जेरबंद केले आहे.
वरिष्ठांच्या आदेशा अन्यये गुन्हे प्रतिबंधकपथक शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हदीत पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत होते. मनपा बस स्टॉप भागात पोलिस उपनिरिक्षक अजित बडे याना गुन्ह्यातील आरोपी धनंजय गावडे हा त्याच्या घराजवळ आलेला आहे.
अशी माहिती मिळाली. वरिष्ठांनी खात्री करुन कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने पोलीस पथकाने आरोपी धनंजय गावडे याच्या राहत्या घराजवळ जाऊन सापळा रचला. त्यास जागीच त्याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्यावर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. धनंजय गावडे हा तम्मा कुसाळकर टोळीचा सदस्य आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस उपनिरिक्षक अजित बडे, पोलीस हवालदार दिपक चव्हाण, प्रमोद मोहिते, पोलीस नाईक. सचिन जाधव, महावीर वलटे यांनी केली आहे.