सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: भांडण मिटवण्यासाठी आलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना झील कॉलेज परिसरात घडली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सुरेश परमेश्वर भिलारे (वय १८ वर्षे, रा. मराठा हॉटेल जवळ, न-हे) यास अटक केली आहे. न-हे येथील स्वाद हॉटेल समोर, झील कॉलेज चौका जवळ, फिर्यादीचा मित्र आदित्य श्रीकृष्ण वाघमारे (वय २३ वर्षे, रा. कारी, ता. धारूर, जि. बीड) याच्या सोबत झालेली किरकोळ भांडण मिटविण्यासाठी फिर्यादी व आदित्य तेथे गेले होते.
तेथे झालेल्या वादातून सुरेश याने त्याच्या जवळील चाकूने आदित्य याच्या डाव्या हाताच्या काखेजवळ व समोरून छातीच्या खाली असे जीवे ठार मारण्याच्या हेतूने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच फिर्यादी यास शिवीगाळ करून धमकी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव तपास करीत आहेत.

















