महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
दिल्ली: एक वैध बँक खात्याचा तपशील दिल्याशिवाय करदात्यांना येत्या सप्टेंबरपासून ‘जीएसटीआर-१’ हे विवरणपत्र भरता येणार नाही. ‘जीएसटी’च्या ‘नियम १० अ’नुसार, करदात्याने नोंदणीच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत वैध बँक खात्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे.
जे जीएसटी करदाते वैध बँक खात्याचा तपशील सादर करणार नाहीत, त्यांना एक सप्टेंबरपासून जीएसटी अधिकाऱ्यांकडे बाह्य विवरणपत्र (‘जीएसटीआर-१’) दाखल करता येणार नाही. वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) बोगस आणि फसव्या नोंदणीच्या समस्येला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आणि नोंदणी प्रक्रिया बळकट करण्यासाठी जीएसटी परिषदेने गेल्या वर्षी अशी प्रणाली रिझर्व्ह बँकेने प्रायोगिक तत्त्वावर दोन राज्यांमध्ये राबवली होती. आता या याबाबतची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली आहे.
