भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर ट्रेडिंगसाठी खात्यात नेटबँकिंगद्वारे पैसे भरण्यास प्रवृत्त करून १२,३५,००० रुपये फसवणूक केल्याची घटना आंबेगाव बुद्रुक येथे घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २४ ऑगस्ट रोजी घडला आहे. एका अनोळखी तरुणाने फिर्यादी यांना व्हॉट्सअपवर एक लिंक पाठवून ट्रेडिंग ग्रुपमध्ये सामील करून घेतले.
फायदा होत असल्याचे भासवून, फिर्यादींना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये नेटबँकिंगद्वारे पैसे भरण्यास प्रवृत्त करून १२,३५,००० रुपये फसवले गेले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.