३४१०० रुपये किंमतीचे मुददेमाल हस्तगत, बार्शी शहर पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : चिंचुक्याच्या चोरीमधील ५ आरोपीस अटक करून ३४१०० रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ मे २०२४ रोजी फिर्यादी आदित्य आतुल सोनीग्रा यांचे तुळजापुर रोड, मांगडे चाळ येथील गोडावुन मधुन ६४२००/- रुपये किमंतीचे चिंचुक्याची ४० पोती चोरीस गेली होती.
बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. दि.१२ ऑक्टोबर २०२४ रोजी सपोनि दिलीप ढेरे, हवालदार सचिन देशमुख, राहुल उदार, अविनाश पवार, सचिन नितनात, धनराज फत्तेपुरे असे बार्शी शहरात पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी त्यांना गोपनीय माहिती मिळाली कि सोनीग्रा यांच्या गोदामातून चिंचुका हा आरोपी १) सौरभ चंदन पवार वय २३ वर्षे रा. बारंगुळे प्लॉट बार्शी ता. बार्शी जि. सोलापुर २) गणेश संजय रगडे वय २३ रा. मांगडे चाळ बार्शी ता. बार्शी जि. सोलापुर ३) आरबाज रजाक सय्यद वय २२ रा. मांगडे चाळ बार्शी ता. बार्शी जि. सोलापुर ४) मलीक मुबारक शेख वय २० रा. नाळे प्लॉट बार्शी ता. बार्शी जि. सोलापुर ५) सुमीत प्रभाकर पवार वय १९ रा.अलिपुर रोड बार्शी ता. बार्शी जि. सोलापुर यांनी चोरला आहे. व तो बार्शी येथील व्यापा-यांना विक्री केला आहे.
पोलीसांनी तातडीने कारवाई करीत सर्व आरोपीना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी सदर चोरीची कबुली दिली. (किंमत रू ३४१००/) २० पोती चिंचुका हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि दिलीप ढेरे, पोसई उमाकांत कुंजीर, हवालदार बालकृष्ण डबडे, अमोल माने, बाबासाहेब घाडगे, श्रीमंत खराडे, संगप्पा मुळे, सचिन देशमुख, राहुल उदार, सचिन नितनात, अविनाश पवार, धनराज फत्तेपुरे, अंकुश जाधव, प्रल्हाद अकुलवार, गणेश अंकुशराव, इसामीया बहिरे, बार्शी शहर पोलीस ठाणे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील रतन जाधव यांनी केली आहे. पुढील तपास हवालदार बाळकृष्ण डबडे हे करीत आहेत.

 
			




















