भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास पथकातील पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना पोलिस स्टेशनच्या अभिलेखावरील उघडकीस न आलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या.
उघडकीस न आलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलीस अंमलदार मितेश चोरमले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना माहिती मिळाली की, घरफोडीचा हा गुन्हा रेकॉर्डवरील विधीसंघर्षित बालकाने केला आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन बालकाला ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच, नमूद गुन्ह्यात चोरीला गेलेले १३ ग्रॅम वजनाचे, १ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, आणि पोलीस अंमलदार मितेश चोरमले, अवधूत जमदाडे, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, मंगेश पवार, निलेश जमदाडे, सतिश मोरे, नवनाथ भोसले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांच्या पथकाने केली आहे.

 
			

















