API दिलीप ढेरे यांची कारवाई: ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : श्रीपत पिंपरी येथे स्वामी समर्थ चौकात पत्राशेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर बार्शी तालुका पोलिसांनी बुधवारी दुपारी धाड टाकली. यात मन्ना नावाचा जुगार खेळताना १८ जणांना ताब्यात घेतले. यात ४१ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल नागनाथ आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १६ ऑक्टोबर रोजी श्रीपत पिंपरी बालाजी पोपट इंगळे हा मना नावाचा जुगार चालवत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पत्ते खेळत असलेल्या १८ जणांना ताब्यात घेण्यात आले.
यामध्ये बालाजी पोपट इंगळे (वय ४०), युवराज हनुमंत ताकभाते (४०, दोघे रा. श्रीपत पिंपरी), उत्तरेश्वर बाबासाहेब चिकणे (४०, रा. गुळपोळी), निळवंत नामदेव शिंदे (३८), पुरुषोत्तम रामकृष्ण पिंगळे (५२), अफसर शाबुद्दीन शेख (४०), भीमराव वसंत घाडगे (५४), सुरेश रामभाऊ इंगळे (४४),आबासाहेब महादेव भोसले (३८), दादा महादेव थोरात (५९), दत्तात्रय भीमराव गोरे (४२), राजेंद्र ऊर्फ भागवत पांडुरंग ताकभाते (५२, सर्व रा. श्रीपत पिंपरी), सुदाम साहेबराव चव्हाण (३६, रा. साडे, ता. करमाळा), दीपक अंगद लंकेश्वर (३०), शुभम शिवाजी जाधव (२७), महेश नानासाहेब घाडगे (३९), नीलेशगणपत बोकेफोडे (४२), बिभीषण गोरख लंकेश्वर (५०, सर्व श्रीपत पिंपरी) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी जुगार साहित्यासह मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ४१ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास हवालदार राजेंद्र मंगरूळे करीत आहेत.