भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई, १७ जणांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : विधानसभा निवडणुकीमुळे शहरातील अवैध धंद्यांवर सातत्याने पोलिसांचे छापे पडत आहेत. त्यामुळे शहराच्या बाहेर जाऊन जुगाराचे व्यसन चालू ठेवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. याच पार्श्वभूमीवर जांभुळवाडीतील माऊली बिल्डिंगमध्ये भर दिवसा तीन पत्ती जुगार खेळला जात होता.
भारती विद्यापीठ पोलिसांनी येथे छापा घालून १७ जणांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख १६ हजार ९७० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये किरण गणपत डिंबळे (वय ३५, रा. पर्वती), रोहिदास बाळू गोरड (वय ४३, रा. पर्वती), हर्षद थोरवे (वय २४, रा. शुक्रवार पेठ), दत्ता रघुनाथ जोगी (वय ३२, रा. कात्रज), भिकाजी कापुरे (वय ६३, रा. धनकवडी), विराज पाटील (वय ४५, रा. कात्रज), मुनावर वजीर शेख (वय ४०, रा. कात्रज), वसंत करसन वाघ (वय ४६, रा. शिवणे), योगेश घुमक (वय ३५, रा. सिंहगड रोड), धर्मेंद्र रघुनाथ सिंग (वय ३९, रा. हडपसर), दत्ता वसंत सितप (वय ५२, रा. नऱ्हे), राजेश उत्तेकर (वय ५३, रा. धनकवडी), इम्रान दलाल (वय ३६, रा. कात्रज), लक्ष्मण मानकर (वय ५३, रा. धनकवडी), किशोर सातपुते (वय ३८, रा. दांडेकर पुल) आणि साहिल इब्राहिम (वय २३, रा. धनकवडी) यांचा समावेश आहे.
ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण मानकर याने आरोपींना तीन पत्ती जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती.
किशोर सातपुते याने स्वतःच्या फायद्यासाठी हा जुगार अड्डा चालवत होता. इब्राहिम साठी याने जुगाराचे साहित्य पुरवण्याचे आणि जुगार खेळणाऱ्यांवर देखरेख करण्याचे काम करत होता.भारती विद्यापीठ पोलिसांना जांभुळवाडी येथील माऊली बिल्डिंगमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकला.
त्या ठिकाणी १५ पत्त्यांचे कॅट, १७ मोबाईल, १९ हजार ९७० रुपये रोख रक्कम असा १ लाख १६ हजार ६२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.