फरासखाना पोलिसांनी साडेचार लाखांचा ऐवज केला जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : घरफोडीच्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या मोटारसायकलीचा माग काढून फरासखाना पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील पिता पुत्रांपैकी एकाला पकडले. त्याच्याकडून फरासखाना पोलिसांनी ४ लाख ५७ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
फैय्याज राज मोहम्मद शेख (रा. सत्यानंद नगर, मिठानगर, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फरासखाना पोलीस स्टेशनमधील हद्दीत ३ नोव्हेंबर रोजी दिवसा घरफोडी झाली होती. फरासखाना पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी वैभव गायकवाड व अरविंद शिंदे यांना मार्गदर्शन करुन तपास करण्यास सांगितले होते.
पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपीने वापरलेल्या गाडीचा माग काढला. तसेच तांत्रिक विश्लेषणात हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रय्यान ऊर्फ फईम शेख तसचे त्याचे वडिल या दोघांनी लाल रंगाची बर्गमॅन गाडीवर येऊन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
पोलीस अंमलदार प्रविण पासलकर, गजानन सोनुने व महेश राठोड यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी फैय्याज शेख याला अटक केली. चौकशीत त्याच्याकडून ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम वजनाची चांदीच वीट, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, ५५ हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, कटावणी असा सर्व मिळून ४ लाख ५७ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे निरीक्षक अजित जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, सहाय्यक फौजदार मेहबुब मोकाशी, पोलीस अंमलदार प्रविण पासलकर, गजानन सोनुने, महेश राठोड, वैभव स्वामी, तानाजी नांगरे, नितीन तेलंगे, संदिप कांबळे, विशाल शिंदे, किशोर शिंदे, नितीन जाधव, अर्जुन कुडाळकर, समीर माळवदकर, सुमित खुट्टे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर यांनी केली आहे.