महाराष्ट्र जैन वार्ता
कोल्हापूर : उत्तरप्रदेशमध्ये प्रस्तावित केलेल्या जैन कल्याणक सर्कीट प्रकल्पांवर चर्चेसाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र सरकारच्या जैन आर्थिक विकास महामंडळ चे अध्यक्ष ललित गांधी यांना लखनौ येथे बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.
आयोध्या ही प्रथम जैन तीर्थंकर ॠषभदेव भगवान यांची जन्मभुमि असुन बनारस ही तेवीसावे तीर्थंकर पार्श्वनाथ भगवंतांची जन्मभुमि आहे. जैन तीर्थंकरांचे 19 कल्याणक उत्तर प्रदेशमध्ये विविध ठिकाणी आहेत.
या ठीकाणांना जोडणारे “जैन तीर्थंकर कल्याणक सर्कीट” बनवण्याच्या मागणीचा प्रस्ताव “अखिल भारतीय जैनअल्पसंख्यक महासंघ” तर्फे उत्तरप्रदेश सरकारला सादर केला आहे.
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कोल्हापूर दौर्याप्रसंगी “जैन अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळ”चे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यासपीठावर योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन चर्चा केली.
त्याप्रसंगी योगी आदित्यनाथ यांनी त्यांना या संदर्भात बैठकीसाठी लखनौ येथे आमंत्रित केले. या आमंत्रणासाठी ललित गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना धन्यवाद दिले व डिसेंबर 2024 मध्ये लखनौ येथे येऊ असे सांगितले असल्याची माहीती ललित गांधी यांनी दिली.
यावेळी खासदार धनंजय महाडीक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्य. अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.