मार्केटयार्ड पोलिसांची जलद कारवाई : नागरिकांमध्ये समाधान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील भाजी मार्केटमध्ये परेश प्रविण कोठारी यांचा सॅमसंग फोल्ड ५ मोबाईल (किंमत ₹१,७०,०००/-) दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी हरवला होता. त्यांनी तत्काळ तक्रार नोंदवताच पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान CEIR पोर्टल आणि अन्य तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मोबाईल दावणगिरी, कर्नाटक येथे असल्याचे आढळले. तत्काळ कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे आणि पो. शि. यादव यांनी तो हस्तगत केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या उपस्थितीत परेश कोठारी यांना मोबाईल सुपूर्द करण्यात आला. पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये विश्वास आणि समाधान अधिक दृढ झाले असून, हरवलेली मालमत्ता परत मिळण्याची आशा वाढली आहे.
