५१ पैठण्या व भरगोस बक्षीसे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम शहर सार्वजनिक शिवजन्मोत्सव कमिटीच्या वतीने जिजाऊच्या लेकी साठी दी १८/०२/२५ रोजी सायं ठीक : ६:०० वाजता नगर परिषद समोर भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे.
यात पहिले बक्षीस सोन्याची नथ, दूसरे बक्षीस चांदिचा करंडा, तिसरे बक्षीस ड्रेसिंग टेबल, चौथे बक्षीस कुलर, पाचवे बक्षीस गॅस शेगडी, सहावे बक्षीस मिक्सर, सातवे बक्षीस इस्त्री, व मानाच्या एकूण ५१ पैठण्या अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
संद्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान कुपन देण्यात येणार आहेत तरी भूम शहरातील जिजाऊच्या लेकीनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिव जन्मोत्सव सोहळा २०२५ अध्यक्ष आदित्य भोळे यांनी केले आहे.
