महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भुम तालुक्यातील शेखापूर येथे हजरत गैबी पीर बाबा रहमतुल्लाह अलैह यांच्या संदल निमित्त KGN ग्रुप संदल कमिटी आणि मोईज सय्यद मित्र मंडळाच्या वतीने भव्य कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रसिद्ध कव्वाल शाहेद अजमेरी आणि परवीन अजमेरी यांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली. कव्वालीचा हा शानदार कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोईज सय्यद, रैशोददीन शेख, ताहेर पटेल, उमेश गोरे, राजाभाऊ सुके, सादिक शेख, मुशरफ सय्यद, फिरोज शेख, अजिज पठाण, संजय गायकवाड, सादिक सय्यद, अमर बादेला, प्रमोद हिवरे, अयसल शेख, मुनवरअली पठाण, हादिस शेख, युसूफ सय्यद, उमेद शेख आणि रमजान सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले.
