युवाशक्तीच्या माध्यमातून परिवर्तन शक्य : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी आणि सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर मुळशी तालुक्यातील कुळे गाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
‘युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरसी’ अशी संकल्पना असलेल्या शिबिरात ५० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी ग्रामस्वच्छतेसह, वृक्षारोपण, बालविवाह प्रतिबंध रॅली, आरोग्य जनजागृती रॅली, नवीन मतदार जनजागृती, ग्राम सर्वेक्षण, मोफत फिझिओथेरपी शिबिर, रस्ते सुरक्षा अभियान, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध, श्रमसंस्कार वर्ग आदी विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांना सामाजिक संदेश देण्यात आला.
सदर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सह. उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, उप प्राचार्य दीपक सिंग, प्राचार्य श्रीकांत जगताप, सरपंच आकाश साठे, उपसरपंच दिपाली साठे, ग्रामसेवक मोहन डोणगावे, पोलीस पाटील हेमलता मानकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष नारायण साठे, मुख्याध्यापक कुंडलिक मेटकरी, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदीप ढोरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. लिओनार्ड वर्मा, प्रा. चैताली साळुंके, मृणाल गायकवाड, प्रा. मोनिका कुलकर्णी, डॉ. सोनिया करडे, डॉ. रागिणी मेहता, प्रा. वैष्णवी पुनाळकर आदी उपस्थित होते.
प्रा डॉ संजय बी चोरडिया, संस्थापक व अध्यक्ष, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस पुणे म्हणाले, विकसित भारत २०४७ हे भारताचे व्हिजन आहे. हे पूर्ण करण्याकरिता युवावर्गाचा सकारात्मक सहभाग महत्वाचा आहे.
युवाशक्तीच्या माध्यमातून परिवर्तन शक्य आहे. राष्टीय सेवा योजना च्या माध्यमातून सूर्यदत्त च्या वतीने हे कार्य सातत्याने होत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात या योजनेमार्फत स्वच्छता, विचारांचे परिवर्तन आणि राष्ट्र निर्माणचे कार्य उभारले जात आहे याबद्दल विध्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचे त्यांनी अभिनंदन केले.
सदर श्रमसंस्कार शिबिरात स्वयंसेवकांकरीता तसेच ग्रामस्थांकरिता डॉ. सोनिया करडे यांचे मानसिक आरोग्य या विषयावरती, प्रसिद्ध निवेदक आणि लेखक प्रा.डॉ. सुनील धनगर यांचे चला पुन्हा पेटवू आयुष्याच्या मशाली, प्रा. तृप्ती माळी यांचे महिला सबलीकरण, प्रा. शिल्पा संत यांचे व्यक्तिमत्व विकास ता विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले.
तसेच प्राचार्य डॉ.सीमी रेठरेकर, डॉ. सबीना सलीम हकीम, डॉ. क्षिरसागर – सूर्यदत्त कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्या माध्यमातून फिजिओथेरपी कॅम्प आयोजित करण्यात आला. या आरोग्य शिबिराचा लाभ ग्रामस्थांनी घेतला.
सूर्यदत्त च्या स्वयंसेवकांच्या वतीने येथील ज़िल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकरिता विविध खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या आयोजनात उत्साहाने सहभाग घेतला.
