क्रिकेट स्पर्धेत वारेवडगाव संघ विजेता
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : भूम येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्ष स्थापन दिनानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत भूम तालुक्यातील विश्वनाथ महाराज क्रिकेट क्लब, वारेवडगाव संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
विजेत्या संघास काँग्रेस कमिटीचे विलास शाळू आणि भूम-परंडा-वाशी विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोईज सय्यद यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. प्रथम पारितोषिक ₹ 71,140 विश्वनाथ महाराज क्रिकेट क्लब, वारेवडगाव (ता. भूम), द्वितीय पारितोषिक ₹ 51,140 युवा क्रिकेट क्लब, भूम आणि तृतीय पारितोषिक ₹ 31,140 स्वराज्य ११ क्रिकेट क्लब, बार्शी यांना देण्यात आले.
तसेच उत्तेजनार्थ बक्षीसही वितरित करण्यात आले. यावेळी धाराशिव जिल्हा लिगल काँग्रेस विभागाचे अध्यक्ष ऍड. उमेश गवळी, भूम तालुका विद्यार्थी युवक काँग्रेस (NSUI) तालुकाध्यक्ष ऍड. मुशरफ सय्यद, श्रीपाद देशमुख, संयोजक गणेश दातखिळे, फरजान काझी, स्वप्निल सुपेकर तसेच सर्व संघांचे खेळाडू, काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
