योग्य परिपक्वता आणि ज्ञान प्राप्त करून करिअर निर्णय घ्या : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : चित्रपटात केलेल्या अभिनयातून प्रेरणा देण्याचे काम मी करत असते . चित्रपटाची कथा प्रेरणात्मक असेल तरच मी ती स्वीकारते. सूर्यदत्त च्या विद्यार्थ्यांनी योग्य चित्रपट पाहून प्रेरणा घ्यावी आणि त्या प्रेरणेतून आपले ध्येय प्रत्यक्षात उतरवावे.
प्रत्येकानी स्वप्रेरणेतून नात्यातील अथवा करियर मधील निर्णय घ्यावा. असे मत प्रख्यात अभिनेत्री अदा शर्मा यांनी व्यक्त केले. तुमको मेरी कसम या चित्रपटाच्या निमित्ताने सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स बावधन कॅम्पसमध्ये आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या.
मला मराठी येते आणि मी मराठीतून संवाद साधायचा प्रयत्न करते या त्यांच्या वाक्यावर सभागृहाने उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून दाद दिली. स्त्री शक्ती उपक्रमाबद्दल त्यांनी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस चे अभिनंदन केले. तसेच चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.
अभिनेता ईश्वाक सिंग म्हणाले, कष्ट, आवड आणि प्रयत्न या त्रिसूत्रीच्या आधारे आपापल्या क्षेत्रात यश शक्य आहे. ग्लॅमरस क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्वानी आपली आवड जाणून घेणे गरजेचे आहे. स्वतःशीच स्वतःची ओळख गरजेची आहे .
एक उत्कृष्ट चित्रपट आपल्या भेटीसाठी येत आहे. आपण जरूर तो पाहावा. या चित्रपटातील आपली भूमिका वेगळी असल्याचे त्यांनी नोंदविले. बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी ‘सूर्यदत्त’चे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, प्रेरणात्मक वक्ता दत्ता कोहिनकर, प्रशांत पितालिया, एस रामचंद्रन, किरण राव, मनीषा कुंभार यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, अभिनेत्री अदा शर्मा, अभिनेता ईश्वाक सिंग, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, प्रेरणात्मक वक्ता डॉ दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते ‘सूर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार “ने रेशु अगरवाल (शिक्षण), ऍड रूपल चोरडिया (पत्रकारिता) शोभा कुलकर्णी (सूत्र संचालन व अध्यात्मिक सेवा) यांचा सन्मान करण्यात आला.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी अदा शर्मा, ईश्वाक सिंग यांच्याशी संवाद साधत विद्यार्थ्यांसमोर चित्रपट कलाकारांचे व्यक्तित्व तसेच त्यांची चित्रपटातील भूमिका यांची मांडणी केली. तसेच संपूर्ण महिनाभर सुरु असणाऱ्या स्त्री शक्ती महिना कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे नमूद केले.
तुमको मेरी कसम चित्रपटाचे कथानक संवदेनशील असून महिलांसाठी महत्वाचे आहे आणि त्यामुळे संवाद घडत असल्याचे ते म्हणाले. चित्रपट कलाकार आणि त्यांचे जीवन यातून विद्यार्थ्यांना सातत्याने नवे काही शिकता यावे याकरिता असा उपक्रम महत्वाचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रत्येकाने योग्य परिपक्वता आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर आपल्या आवडीचे अनुसरण करत करिअरबद्दल निर्णय घ्यावा आणि कठोर परिश्रम करावे असेही ते म्हणाले कार्यक्रमाच्या सुरुवातीस माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांची’ मनशक्ती व तनाव मुक्ती” या विषयावरची कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत जवळ जवळ १००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. डॉ. दत्ता कोहिनकर म्हणाले, बाह्यमन अंतर्मनाला ज्या प्रकारच्या सूचना देतात तशा प्रकारच्या संप्रेरकांची निर्मिती आपल्या शरीरामध्ये करण्याचे काम अंतर्मन करते.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार करावा व स्वतःवर प्रेम करावे. जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही होत असता. यावेळी त्यांनी बाह्य मन व अंतर्मन यातील फरक उदाहरणा सह स्पष्ट करून दाखवला.
डॉक्टर कोहिनकर यांनी अनेक उदाहरणे देऊन व प्रात्यक्षिकाद्वारे मनाच्या शक्ति बद्दल सर्व विद्यार्थ्यांना अवगत केले ते म्हणाले 90% आजार हे मानवी मनाशी संबंधित असतात त्यामुळे मन प्रमुख आहे हजार युद्ध जिंकण्यापेक्षा मनाचा एक युद्ध जिंकणारा योद्धा सर्वश्रेष्ठ असतो.
त्यासाठी त्यांनी सकारात्मक स्वयं सूचना, सकारात्मक चलचित्र पाहणे, यासारख्या अनेक गोष्टी उदाहरणासह समजावून सांगितल्या. व काही प्रात्यक्षिकेद्वारे मनाच्या शक्ति बद्दल विद्यार्थ्यांना अवगत केले.
निरोगी शरीर हे आयुष्यातील सर्वात मोठे सुख असते त्यामुळे रोज व्यायाम करा स्वतःला वेळ द्या व स्वतःवर प्रेम करा अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. व विद्यार्थ्यांना आपले ध्येय कसे साध्य करायचे व तणाव मुक्त राहुन अभ्यासात कशी प्रगती करायची यासारख्या अनेक गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष शिकवल्या.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आनापान ध्यान साधने विषयी व विपश्यना ध्यान साधने विषयी सविस्तर माहिती दिली. प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल नवलखा यांनी आभार मानले.
