बार्शीत रोटरी व रोट्रॅक्ट क्लबतर्फे गौरव समारंभ : राष्ट्रीय खेळाडूंचाही विशेष सत्कार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : रोटरी क्लब ऑफ बार्शी तर्फे आयोजित “राष्ट्रनिर्माता पुरस्कार २०२५” वितरण समारंभ रविवार, दि. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी माई सोपल सभागृह, सुभाषनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लब अध्यक्ष रो. संजय हिंगमिरे यांच्या हस्ते मीटिंग कॉल टू ऑर्डर ने झाली. त्यानंतर विश्वशांती प्रार्थना व राष्ट्रगीत घेण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. व्ही. पी. शिखरे (प्राचार्य, कॉलेज ऑफ एज्युकेशन) तर कार्यक्रमाध्यक्ष म्हणून आनिरुद्ध सी. चाटी (मुख्याध्यापक, सिल्वर ज्युबिली प्रशाला, बार्शी) उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अनुक्रमे रो. अशोक हेड्डा व रो. पुरुषोत्तम शेट्टी यांनी केले.
यावेळी रोटरी सभासद रो. गोविंद बाफना, रो. मल्लिकार्जुन धारूरकर व रो. सुहास शामराज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. नवनाथ गुल्हाने यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ बार्शीची माहिती रो. सुहास श्यामराज यांनी दिली. अध्यक्ष रो. संजय हिंगमिरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की-“प्रिय शिक्षकहो, आपण दिलेली शिकवण विद्यार्थ्यांच्या मनात वर्षानुवर्षे झळकत राहते.
आपण घडवलेली पिढी समाजाला आणि देशाला योग्य दिशा दाखवते. आजचा हा Nation Builder Award आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असून, पुढील कार्याला नवी प्रेरणा देणारा ठरेल. रोटरी क्लब ऑफ बार्शी तर्फे मी सर्व सन्मानित शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आपले कार्य असेच प्रेरणा देत राहो, हीच शुभेच्छा.”
यावेळी ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रायोजित केल्याबद्दल VK मार्ट यांचे विशेष आभार मानण्यात आले. समारंभात विशेष सत्कारही करण्यात आला. रो. निलेश सरवदे, रो. अजित मिरगणे (लंडन येथे सायकलिंग), तसेच राष्ट्रीय खेळाडू कु. श्रीराम घोडके, कु. ओम खळदकर व कु. राजवर्धन तिवारी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव झाला.
तसेच रोटरी परिवारातील शिक्षक – रो. मधुकर डोईफोडे, रो. स्मिता शामराज, रो. नवनाथ गुल्हाने, रो. विजयाश्री पाटील व रो. गणेश स्वामी – यांचा शिक्षक दिनानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला.
रो. अशोकजी हेड्डा यांनी पुरस्कार विजेत्या शिक्षकांना ‘स्वच्छ भारत अभियान’ या उपक्रमात त्यांच्या शाळांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
पुरस्कार विजेते प्रमोद पांडुरंग माळी व सूर्यकांत दत्तात्रेय सोनार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रमुख पाहुणे डॉ. व्ही. पी. शिखरे व कार्यक्रमाध्यक्ष आनिरुद्ध चाटी यांनीही आपल्या भाषणातून शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन रो. स्मिता श्यामराज यांनी केले. सचिव रो. मधुकर डोईफोडे, प्रकल्प प्रमुख रो. विजयाश्री पाटील, रो. विनयभाई संघवी, नितीन बकाल, कौशिक बंडेवार, अतुल कल्याणी, विशाल देशमुख, डॉ. लैला तांबारे, डॉ. मुकुंद तांबारे व आनंद महाजन हे उपस्थित होते.
समारंभ यशस्वी करण्यासाठी रोट्रॅक्ट क्लबचे सचिव गौरव कमठाणे, शुभम भागवत, संदीप सोनावणे व अॅड. राज नानावटी यांनी परिश्रम घेतले. समारंभाचे छायाचित्रण रो. मल्लिकार्जुन धारूरकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रो. गणेश स्वामी यांनी केले. शेवटी आनंद बेदमुथा यांनी Four Way Test घेतली आणि कार्यक्रमाचा समारोप झाला.
‘राष्ट्रनिर्माता पुरस्कार २०२५’ खालील शिक्षकांना प्रदान करण्यात आला –
हेमंत बसवेश्वर गाढवे (सिल्वर ज्युबिली प्रशाला)
प्रमोद पांडुरंग माळी (सुलाखे हायस्कूल)
बिपीन अंबऋषी जाधव (प्राथमिक आश्रम शाळा, खामगाव)
अनिल गहिनीनाथ कांबळे (कॉलेज ऑफ एज्युकेशन)
अरविंद जालिंदर कोळी (शेठ अगरचंद कुंकूलोळ प्रशाला)
सुलभा नरसिंह काळे (जिल्हा परिषद मुलींची शाळा, पानगाव)
प्रणित शरद कदम (जिजामाता विद्यालय)
महेश मनोहर देशमुख (महात्मा फुले विद्यालय)
शुभांगी मालोजी हाजगुडे (महाराष्ट्र विद्यालय)
सूर्यकांत दत्तात्रेय सोनार (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंबरगे)
