महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : आरसोली (ता. भूम) येथील नितीन श्रीधर गुंजाळ यांची महाराष्ट्र पोलीस मित्र समितीच्या भूम तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही निवड राज्य रक्षक संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र पोलीस मित्र समितीच्या वतीने मागील आठवड्यात करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य रक्षक संघाच्या माध्यमातून कार्यरत असलेली पोलीस मित्र समिती अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारांविरुद्ध लढा देत असताना पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या कामात सहाय्य करणे हे समितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
राज्यात या समितीचा अधिकाधिक विस्तार व्हावा यासाठी अलीकडेच विविध ठिकाणी पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडप्रसंगी महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र समितीचे राज्याध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते नितीन गुंजाळ यांना निवडीचे पत्र आणि ओळखपत्र प्रदान करण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून पोलीस मित्र समितीचे कार्य उल्लेखनीय ठरले असून, पोलिस प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून या समितीकडे पाहिले जाते. आगामी काळात “गाव तिथे पोलीस मित्र” ही संकल्पना राबविण्याचा निर्धार तालुका अध्यक्ष नितीन गुंजाळ यांनी व्यक्त केला आहे.
















