५ नवीन पोलीस ठाण्यांसह २ नवीन परिमंडळे व ४ सहायक पोलीस आयुक्त पदांना शासनाची मंजुरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि गुन्हेगारीचा वाढता व्याप लक्षात घेऊन पोलीस प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस दलाच्या रचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
शासनाने पुणे शहर पोलीस दलात नव्याने ५ पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यास मान्यता दिली असून, त्याचबरोबर २ नवीन परिमंडळे आणि ४ नवीन सहायक पोलीस आयुक्त पदांची निर्मिती करण्यासही मंजुरी दिली आहे. पुणे शहर पोलीस दलातील सध्याच्या परिमंडळांची पुनर्रचना करून एकूण २ नवीन परिमंडळे निर्माण करण्यात येणार असून, त्यामुळे आता पुणे शहरात एकूण ७ परिमंडळे कार्यरत राहणार आहेत.
या दोन नवीन परिमंडळांसाठी २ पोलीस उपायुक्त पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी २ कोटी ३६ लाख ४८ हजार रुपयांचा आवर्ती खर्च आणि ९० लाख ३८ हजार रुपयांचा अनावर्ती खर्च मंजूर करण्यात आला आहे.
दोन अपर पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत पश्चिम प्रादेशिक विभाग आणि पूर्व प्रादेशिक विभाग असे विभागीकरण करण्यात आले आहे. पश्चिम प्रादेशिक विभागात ३ पोलीस उपायुक्त, ६ सहायक पोलीस आयुक्त आणि २० पोलीस ठाणी असणार आहेत, तर पूर्व प्रादेशिक विभागात ४ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त आणि २४ पोलीस ठाणी कार्यरत असणार आहेत.
परिमंडळ १ अंतर्गत
फरासखाना सहायक पोलीस आयुक्त –
खडक, फरासखाना, समर्थ पोलीस ठाणे
विश्रामबाग सहायक पोलीस आयुक्त –
विश्रामबाग, शिवाजीनगर, डेक्कन पोलीस ठाणे
परिमंडळ २ अंतर्गत
स्वारगेट सहायक पोलीस आयुक्त –
स्वारगेट, सहकारनगर, पर्वती पोलीस ठाणे
भारती विद्यापीठ सहायक पोलीस आयुक्त –
बिबवेवाडी, मार्केटयार्ड, भारती विद्यापीठ, आंबेगाव पोलीस ठाणे
परिमंडळ ३ अंतर्गत
कोथरुड सहायक पोलीस आयुक्त –
कोथरुड, वारजे माळवाडी, आलंकार पोलीस ठाणे
सिंहगड रोड सहायक पोलीस आयुक्त –
उत्तमनगर, नांदेड सिटी, सिंहगड रोड, नर्हे पोलीस ठाणे
पूर्व प्रादेशिक विभाग
परिमंडळ ४ अंतर्गत
खडकी सहायक पोलीस आयुक्त –
बाणेर, चतु:श्रृंगी, खडकी पोलीस ठाणे
येरवडा सहायक पोलीस आयुक्त –
विश्रांतवाडी, येरवडा, लक्ष्मीनगर पोलीस ठाणे
परिमंडळ ५ अंतर्गत
वानवडी सहायक पोलीस आयुक्त –
येवलेवाडी, कोंढवा, वानवडी पोलीस ठाणे















