मा. नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते विधिवत पूजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : येथील ग्रामदैवत श्रीक्षेत्र आलमप्रभू देवस्थानच्या वार्षिक यात्रेस शनिवारी (दि. १३) मोठ्या भक्तिभावात व उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेनिमित्त श्रींची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. सकाळी ८ वाजता नंदीवरून मिरवणूक काढल्यानंतर रथ मिरवणूक रथ गल्ली येथून वाजत–गाजत नगर परिषद समोरील प्रांगणात दाखल झाली.
मिरवणुकीदरम्यान भूम नगरपालिकेचे माजी गटनेते मा. संजय गाढवे यांच्या हस्ते रथावर विराजमान श्रींची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी त्यांनी मनोभावे दर्शन घेत भाविकांसह यात्रेचा आनंद साजरा केला.
या प्रसंगी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गाढवे, श्री क्षेत्र आलमप्रभू देवस्थानचे विश्वस्त अॅड. संजय शाळू, मेजर पोळ, भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गाडे, जनार्दन गाडे, महेश मनगिरे, मुशीर शेख, नंदकुमार देशमुख, चेतन शाळू, बालाजी आकरे, कुंदन शिंदे यांच्यासह असंख्य भाविक भक्त उपस्थित होते
रात्री ८.३० वाजता नगर परिषद समोरील प्रांगणात ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांची कीर्तनसेवा पार पडली. या यात्रेसाठी भूम शहरासह तालुक्यातील विविध भागांतून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.















