पुणे : प्रभाग क्रमांक २१, मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क येथील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ यशवंत भिमाले, प्रसन्नजीत भरत वैरागे, सिद्धी अविनाश शिळीमकर, मनिषा प्रविण चोरबेले यांनी जीतोचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी चेतन भंडारी, इंद्रकुमार छाजेड, अजय मेहता, दिलीप विनायकिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


















