गुन्हे शाखा युनिट ५ची कारवाई : वेळेवर व्याज न दिल्याने शिवीगाळ व दमदाटी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अवैध्य रितीने सावकारी करून १२ टक्के दराने व्याज घेणाऱ्या सावकारास गुन्हे शाखेच्या युनिट ५ने भा.दं.वि. कलम ४५२,५०६ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ व ४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आशिष संजय पाटणे ( रा. येवलेवाडी, कोंढवा.) असे या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी जुबेर मेमन (वय ३२ वर्षे, रा. कोंढवा बु.) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले कि, फिर्यादीने १२ टक्के दराने दमदाटी करुन व्याज घेतो याबाबतचा तक्रारी अर्ज गुन्हे शाखा येथे केला होता. सदर अर्जाची सखोल चौकशी करुन येवलेवाडी येथिल आशिष पाटणे यास युनिट ५ कडील अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेवून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सदर फिर्यादीकडे चौकशी केली असता फिर्यादी याने आरोपीकडुन आठ लाख रुपये व्याजाने घेतले होते परंतु लॉकडाउनमुळे फिर्यादी हे वेळेवर व्याज देवु शकले नाही म्हणुन आरोपी हा फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी करु लागला सुमारे आठ लाख मुद्दलवर आरोपी याने हिशोब काढुन फिर्यादी यांना २२ लाख रुपये दयावे लागणार म्हणुन धमकी देत होता.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस अमंलदार दया शेगर, महेश वाघमारे, विशाल भिलारे, आश्रुबा मोराळे, पृथ्वीराज पांडोळे, दाऊद सय्यद, विनोद शिवले, विलास खंदारे, अजय गायकवाड, संजयकुमार दळवी, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांनी केलेली आहे.
