सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : ६०० रुपये व आधार कार्ड जबरदस्तीने काढून घेतले होते
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पार्टीसाठी पैसे हवे असल्याने एका गुंडांच्या टोळक्याने तरुणाच्या गळ्याला कोयता लावून त्यांच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेऊन लुबाडले. सिंहगड रोड पोलिसांनी या टोळक्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करुन ६ जणांना अटक केली आहे.
विशाल राजू लोंढे (वय २४, रा. आंबेडकरनगर, धायरी), साई ऊर्फ संतोष आगंद आखाडे (वय १९), आकाश बाबुराव शिंदे (वय २१, रा. नर्हे), आदित्य संतोष घोरपडे (वय १९), ओंकार तानाजी तुपे (वय २१, रा. धायरी) आणि आदया ऊर्फ आकाश विलास जानराव (वय २३, रा. धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रविण सिद्राम थोरे (वय ३६, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, थोरे हे त्यांच्या मित्रांसोबत चरवड वस्ती येथील पी एम सी पाण्याच्या टाकीजवळ २३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी पाच दुचाकीवरुन आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना पकडून त्यांच्या गळ्याला कोयता लावला. पँटच्या खिशातील १६०० रुपये व आधार कार्ड जबरदस्तीने काढून घेतले. आपल्याला पार्टीला पैसे भेटले रे’’ असे मोठ्याने ओरडत त्यांच्या गाडीचे १५ हजार रुपयांचे नुकसान केले. हा प्रकार सुरु असताना जाणारे येणारे थांबून पाहू लागले. तेव्हा त्यांनी लोकांना काय बघताय रे हरामखोरांनो तुम्हालाही मारुन टाकू अशी धमकी देऊन दहशत निर्माण करुन निघून गेले.
अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहाय्यक आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ निरीक्षक युसुफ शेख, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले तपास करीत आहेत.
