गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कारवाई : ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील सहा पोलीस स्टेशनअंतर्गत वाहनचोरी, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाच जणांना गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाने अटक केली. आरोपीकडून सहा गुन्हे उघडकीस आणून ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यात सोहेल कादर शेख (वय २३, रा. जे. के. पार्क, कोंढवा) याला अटक करून आठ हजार रुपये किमतीची हिरो पॅशन मोटरसायकल जप्त केली.
कोंढवा पोलीस स्टेशमध्ये दाखल गुन्ह्यातील सुरेश बाबुदास वैष्णव (वय २६, रा. कस्पटेवस्ती, हडपसर) याला अटक करून त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीची ॲक्सेस गाडी तर स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतून चोरून नेलेला २३ हजार रुपये किमतीचा सॅमसँग कंपनीचा मोबाईल जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले.
बंडगार्डन पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील आरोपी गणेश संजय पोळ (वय २७, रा. ताडीवाला रोड, पुणे) याला अटक केली. तर हनुमंत ऊर्फ गोट्या दत्तात्रय शेजवळ (वय ३१, रा. धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे) व जतीन मधुकर बोळे (वय १९, रा. धनकवडी, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, सहायक पोलीस निरिक्षिका वैशाली भोसले, सहायक पोलीस फौजदार यशवंत आंब्रे, पोलीस अंमलदार अस्लम पठाण, मोहसीन शेख, उत्तम तारू, गजानन सोनुने, कादीर शेख,मितेश चोरमोले, निखील जाधव, समीर पटेल, किशोर वग्गू, चंद्रकांत महाजन, साधना ताम्हाणे, चेतन गोरे, नागनाथ राख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
