चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : पोलीस उपनिरीक्षक पतीचे कर्करोगाने झाले निधन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस उपनिरीक्षक याच्या मृत्युनंतर त्याच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यासाठी पत्नीने बनावट मार्कलिस्ट व प्रमाणपत्र तयार करुन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी वाशिम येथील एका महिलेविरूध्द चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिलेचे पती हे अंगुलीमुद्रा पोलीस उपनिरीक्षक या पदावर वाशिम येथे सीआयडीच्या कार्यालयात कार्यरत होते. त्यांचे कर्करोगाने २२ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यासाठी त्यांची पत्नी यांनी २६ ऑक्टोबर २०१७ रोजी सहायक शासकीय दस्तऐवज परिक्षक किंवा लिपिक या पदावर नोकरी मिळविण्यासाठी विनंती अर्ज केला. त्यासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांचेकडील बी. ए. तृतीय वर्षाचे मार्कलिस्ट व प्रमाणपत्र खोटे व बनावट बनवून ते अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग यांना सादर करुन फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.
