एक गावठी कट्टा व जिवंत काडतुस जप्त : गुन्हे शाखा- खंडणीविरोधी पथक-२ची कामगिरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : येरवड्यातील वाडिया बंगला बीआरटी बसथांब्याजवळ थांबलेल्या नारायणगाव येथील खुनातील आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ने बेड्या ठोकल्या. आरोपीकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस हस्तगत केले.
ज्ञानेश्वर श्रीकांत पाबळे (वय २४) आणि दत्तात्रय विश्वनाथ भाकरे (वय २२, दोघे, रा. मु.पो. कावळपिंपरी, पो. जांबुत, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी नारायणगाव पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यातील आरोपी वाडिया बंगला, बी.आर.टी. बसथांबा येरवडा येथे थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस हस्तगत केले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गाजनन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा खंडणीविरोधी पथक-२चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, प्रदीप शितोळे, विजय गुरव, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, प्रवीण पडवळ, चेतन शिरोळकर, प्रदीप गाडे, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.
