आवृत्ती पुणे

पुण्यात डिलीव्हरी बॉयने तरुणीकडे पाहून केले ‘लज्जास्पद कृत्य’

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : उंड्रीतील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अलीकडे ऑनलाइन खरेदीची टूमच आली आहे. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही ऑनलाईन वस्तू मागवत असतात. त्याची डिलिव्हरी देण्यासाठी डिलिव्हरी बॉय कधीही घरी येत असतात. अशाच एका घरात डिलिव्हरी बॉयने रात्री उशिरा डिलिव्हरी देण्यासाठी आला आणि घरात एका 23 वर्षीय तरुणीला पाहून … Read more

एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने ३४ लाखाला गंडा घालणारा जेरबंद

विमानतळ पोलिसांत गुन्हा : पुण्यातील विमानतळ नीलकमल सक्सेस प्रा.लि.मध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास 100 दिवसात रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून 34 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्याला जेरबंद केले असून, तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2021 ते 3 डिसेंबर या … Read more

वाहतूक पोलिस कर्मचारी लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पोलीस खात्यात खळबळ – सोलापूर रस्त्यावर कवडीपाट टोलनाक्यावर केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी बसेसला प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याच दरम्यान पोलिसांकडून लाचेची मागणी होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेसवर कारवाई न करण्यासाठी लोणी काळभोर … Read more

पीएमपी बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात गॅप

कात्रज सर्पोद्यानसमोर घडला प्रकार : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये बस चालकाविरुद्ध गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव वेगात जाणारी पीएमपी बस जोरात आदळल्याने बसमधील एका ज्येष्ठ नागरिकाच्या मणक्यात गॅप पडल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. यानंतर या प्रवाशाने थेट भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत पीएमपी बस चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरुन … Read more

पुजाऱ्याला लुबाडणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

जादूटोणा केल्याचा आरोप : लोणीकंद पोलिसांत महिलेसह 3 जणांवर खंडणीचा गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका पुजाऱ्यास तुम्ही भोंदुगिरी करता, जादुटोणा करता, तुमच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करणार असल्याची धमकी देऊन त्यांना १ लाख रुपयांना लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखलकरुन दोघांना अटक केली आहे. हा … Read more

पोलीस असल्याचे सांगून चोरट्यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला लुटले

चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा : पुण्यातील पाषाण परिसरात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फिरायला बाहेर गेलेल्या एका ज्येष्ठ दाम्पत्याला पोलीस असल्याचे सांगून दोन चोरट्यांनी महिलेच्या अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवण्यास सांगून हातचलाखीने २ लाख ६० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार सूस रोडवरील वरदाहिनी सोसायटीजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला.याप्रकरणी पाषाण येथील … Read more

पोलीस चौकीत राडा करीत पीएसआयची गचांडी धरणारा जेरबंद

पुण्यातील खळबळजनक घटना : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांच्यासोबत हुज्जत घालून पोलिसांना मारहाण करण्याचे प्रकार पुण्यात अनेक ठिकाणी घडत आहेत. वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या तरुणाला पोलीस चौकीत आणल्यानंतर त्याने चौकीतच राडा घातला. एवढेच नाहीतर पोलीस चौकीमधील खुर्च्यांची फेकाफेक करत पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करुन मारहाण … Read more

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील लिपिकांना लाच घेताना पकडले

अँटी करप्शनची कारवाई : इंजिनिअरच्या शासकीय लायसन्सचा प्रस्ताव पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची मागितली लाच महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सुशिक्षित बेरोजगार इंजिनियरचे शासकीय लायसन्सचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागून 15 हजार स्वीकारताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे कार्यालयातील दोन लिपिकांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई करण्यात आली असून दोघांविरुद्ध … Read more

सोनसाखळी चोरट्यास खराडीत केले जेरबंद

चंदननगर पोलिसांची कामगिरी : एक लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चंदननगर पोलिसांनी सोनसाखळी चोरट्याला शिताफीने पकडून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून एक लाख ५१ हजार रुपयांचा माल हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले. भालचंद्र मोकाशी (वय ३०, रा. सोमेश्वरनगर, करंजे, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी … Read more

स्वच्छतागृहात जायच्या आधी महिलांना लिहावा लागायचा अर्ज

हिंजवडीतील धक्कादायक प्रकार : ‘या’ कंपनीतील प्रकाराचा ‘मनसे’ कडून ‘पर्दाफाश’ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिरंगुट येथील एका कंपनीत महिलांना अपमानजनक वागणूक दिली जात असल्याचं समोर आलंय. एका कंपनीत महिलांना मानसिक त्रास दिला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे स्वच्छतागृहात जाण्यापुर्वी त्यांच्याकडून अर्ज लिहून घेतला जात होता. तसेच, … Read more