आवृत्ती पुणे

पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून केली अटक

आरोग्य विभाग भरती पेपर फुटीप्रकरण : न्यायालयाने ७ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्य आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी 31 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. याप्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलीस करत असून, या प्रकरणात … Read more

बनावट प्रमाणपत्रावर झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा पर्दापाश

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : बीडमध्ये बिनतारी संदेश विभागात कार्यरत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यस्तरीय खेळाडू असल्याबाबतच्या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे पोलीस दलात नोकरी मिळवणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनेश नवनाथ करांडे (रा. बीड) असे बनावट प्रमाणपत्र तयार करुन नोकरी मिळवणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव … Read more

वारजे येथील निलेश गायकवाडसह 11 जणांवर ‘मोक्का’

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 61 वी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आपली दहशत निर्माण करण्यासाठी व बदला घेण्यासाठी गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या निलेश गायकवाड याच्यासह त्याच्या टोळीतील 11 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्या सव्वा वर्षात केलेली ही 61 वी ‘मोक्का’ कारवाई आहे. निलेश … Read more

महिलेच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

खडक पोलिसांत गुन्हा : उपचारादरम्यान २८ नोव्हेंबर रोजी झाला मृत्यू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोहियानगरमध्ये महिलेच्या शारीरीक व मानसिक त्रासाला कंटाळून ४० वर्षाच्या तरुणाने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. ससूनमध्ये उपचारादरम्यान त्याचा २८ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. दत्तात्रय तानाजी ढावरे (वय ४०, रा. लोहियानगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी … Read more

९१ हजार रुपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्यांची चोरी

सीसीटीव्हीत उघड : कोथरुड, हडपसरमधील 4 सराफांना महिलेने घातला गंडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर आणि कोथरुडमधील दोन सराफांच्या चार दुकानात खरेदीच्या बहाण्याने एका महिलेने सोन्यांच्या अंगठ्या नजर चुकवून चोरून नेल्या. विशेष म्हणजे या महिलेने दोन सराफांच्या कोथरुड आणि हडपसर येथील प्रत्येक दोन दुकानात ही चोरी केली असून, तिने चारही ठिकाणाहून सोन्याच्या अंगठ्यांची … Read more

घटस्फोटास नकार दिल्याने पतीने पत्नीचा एका बुक्कीत पाडला दात

शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयातच घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घटस्फोटाला नकार दिल्याने रागाच्या भरात पतीने भर कौटुंबिक न्यायालयातच पत्नीच्या तोंडावर जोरात बुक्की मारुन तिचा दात पाडला. ही घटना शिवाजीनगर येथील कौंटुंबिक न्यायालयातील दुसर्‍या मजल्यावरील समुपदेशन केंद्राच्या बाहेर २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी सोलापूर येथे राहणार्‍या पत्नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

पुण्यात महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

कोंढव्यातील भाग्योदयनगरमधील घटना : वीजबिल थकबाकीदाराचे वीज खंडित करताना घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात महावितरण कंपनीकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई सुरु आहे. महावितरणकडून पुण्यात सुरु असलेल्या कारवाई दरम्यान कर्मचाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना कोंढवा येथे घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.25) सकाळी दहाच्या सुमारास शाह हाईट्स, भाग्योदय नगर, कोंढवा … Read more

२६-११च्या हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली

सारसबाग येथे कार्यक्रमाचे आयोजन : चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : २६-११ च्या हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांना सारसबाग येथे अभिवादन करण्यात आले. पुणे शहर पोलीस दल व सेवा मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी ८.३० ते ८.४० शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शहिदांच्या स्मरणार्थ चित्रकला … Read more

मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे : येरवडा येथील वाहतूक कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरामध्ये कोरोना महामारीमध्ये रक्ताचा तुटवडा भासल्याने रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणी आल्या. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी येरवडा येथील वाहतूक … Read more

सोशल मिडियावर गाद्या विकणे आले अंगाशी!

सायबर पोलिसांत फिर्याद : महिलेला सायबर चोरट्यांनी घातला साडेपाच लाखांना गंडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टीव्हीवरील जाहिराती पाहून फेसबुकवर गाद्या विक्री करण्याचा एका महिलेचा प्रयत्न चांगलाच अंगाशी आला आहे. सायबर चोरट्यांनी या गाद्या खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करुन त्यांची ५ लाख ४३ हजार ६१ रुपयांची फसवणूक केली. २२ ते २७ डिसेंबर २०२० दरम्यान … Read more