आवृत्ती , पुणे

वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

वाघोली येथील १० एकर जमीन हडपण्यासाठी बनावट महिला उभी करून खरेदीखत तयार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाघोली येथील १० एकर जमीन हडप करण्यासाठी बनावट महिला उभी करून ती जागा स्वतःची असल्याचे भासवून खरेदीखताचे दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

‘पोदार लर्न स्कूल, बार्शी’चा दहावीचा निकाल शंभर टक्के

गुणवंत विद्यार्थ्यांची घवघवीत कामगिरी; पोदार पॅटर्नच्या यशस्वीतेचा लौकिक अधोरेखित महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : पोदार लर्न स्कूल, बार्शीने यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत, गुणवत्तेची उजळण पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. शाळेतील सर्व 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण प्राप्त केले आहेत. शाळेतील उदयन नितीन गायकवाड याने 98.00% … Read more

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान : संजय गाढवे प्रतिष्ठानचा उपक्रम

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : अखंड वसा समाजसेवेचा वर्ष १७ वे – हाक तुमची… साथ आमची” या घोषणेसोबत, विकासरत्न संजय (नाना) गाढवे प्रतिष्ठान, भूम यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सावित्रीबाई फुले सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध शाळांतील इयत्ता १० वी आणि एस.पी. कॉलेजच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा … Read more

लोखंडी रॉडच्या मारहाणीने सुरक्षा रक्षक कोमात

कर्वे रस्त्यावरील घटना : हाऊस किपिंग कंत्राटदाराला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हाऊस किपिंगच्या कंत्राटावरून झालेल्या वादातून कंपनीच्या आवारात येऊन पहाटेच्या सुमारास सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा घाव इतका जोरदार होता की सुरक्षा रक्षक कोमात गेला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी अलंकार पोलिसांनी … Read more

नियम मोडणारी वाहने जप्त करा

नियमभंग करणाऱ्या डंपर : खासगी बसवर कठोर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील अवजड वाहने आणि खासगी बसचालकांकडून वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. अशा प्रकरणांमध्ये आता थेट वाहन जप्तीची कारवाई करा, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी दिले. वाहतुकीवरील यंत्रणेबाबत पोलिसांची कारवाई अपुरी पडत असल्याची नाराजी … Read more

देवस्थान जमिनींच्या व्यवहारांना ब्रेक : महसूलमंत्री बावनकुळे यांचा मोठा निर्णय

न्यायालयीन आदेश अथवा अधिकृत मंजुरीशिवाय कोणतेही व्यवहार नोंदवले जाणार नाहीत : नोंदणी विभागाला स्पष्ट निर्देश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्यातील देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर सरकारनं मोठा ब्रेक लावला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी विभागाला स्पष्ट निर्देश दिले असून, शासन धोरण ठरवले जाईपर्यंत कोणतेही व्यवहार नोंदणीस घेऊ नयेत, असे सांगितले आहे. पुणे – … Read more

गँगस्टर गजा मारणेचा सांगलीतील राईट हँड जेरबंद

सांगलीतील कारागृहात १५ ते २० जणांना घेऊन घेतली भेट : गजा मारणे याच्या नावाने दिल्या घोषणा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येरवडा कारागृहातून गँगस्टर गजा मारणे याला सांगली कारागृहात नेण्यात आले. मारणे समर्थक १५ ते २० जणांना घेऊन सांगली कारागृहात गजा मारणे याची भेट घेऊन त्याच्या नावाने घोषणा देणाऱ्या राईट हँडला गुन्हे शाखेच्या पथकाने सांगलीहून … Read more

सह्याद्री रुग्णालयात नागरी संरक्षण दलाची अग्निशमन प्रात्यक्षिके

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नागरी संरक्षण दल, गृह विभाग (विशेष) पुणे शहर यांच्या वतीने सह्याद्री हॉस्पिटल, शास्त्रीनगर, येरवडा येथे अग्निशमन प्रथमोपचाराबाबत प्रात्यक्षिके करण्यात आली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना मॉकड्रीलच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. या प्रात्यक्षिकात नागरी संरक्षण दलाचे ११ स्वयंसेवक, ३० होमगार्ड जवान, तसेच पुणे महानगरपालिकेच्या येरवडा येथील अग्निशमन … Read more