आवृत्ती , पुणे

लागा तयारीला, महापालिका निवडणुका होणार चार महिन्यात

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश : जुन्या आरक्षणाप्रमाणे निवडणुका घ्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील ४ महिन्यांच्या आत घ्या, असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे गेली ३ वर्षे रखडलेल्या महापालिकांसह जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढील चार आठवड्यांत निघाली पाहिजे. यानंतर … Read more

मोबाईल हिसकावून नेणारा चोरटा जेरबंद

दोन लाखांचे ६ मोबाईल, दुचाकी भारती विद्यापीठ पोलिसांनी केली जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फोनवर बोलत असणाऱ्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्याकडील मोबाईल चोरून नेणाऱ्या दोघांपैकी एका चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून १ लाख ९० हजार रुपयांचे ६ मोबाईल आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. रोहित सुरेश कांबळे (वय १८, रा. जाधवनगर, … Read more

आढळगाव येथे “वर्धमान जैन स्थानक भवन” चे भव्य उद्घाटन

महाराष्ट्र जैन वार्ता आढळगाव: येथील जैन समाजासाठी अभिमानास्पद ठरणाऱ्या वर्धमान जैन स्थानक भवन या भव्य इमारतीचे उद्घाटन शनिवार, ३ मे रोजी पार पडले. अर्हम विज्जा प्रणेता उपाध्याय प्रवर प.पू. श्री प्रवीणऋषिजी म.सा. यांच्या प्रेरणेने आणि अहिल्यानगर येथील अर्हम कल्याणमित्र ग्रुप यांच्या माध्यमातून या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम जैन विधीप्रमाणे अत्यंत भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण … Read more

दगडुशेठ गणपतीच्या दर्शन रांगेत चोरीचा प्रयत्न

मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या दोघी महिलांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शन रांगेत उभ्या असलेल्या महिलेच्या कडेवरील मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. माधुरी संतोष डुकळे (घाडगे) (वय २३) आणि काव्या तनवीर जाधव (वय २१, दोघी रा. रेल्वे फाटकाजवळ, यवत) अशी अटक करण्यात आलेल्यांची … Read more

‘सूर्यदत्त’मध्ये जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा

‘आशावादी भविष्यासाठी आरोग्यदायी प्रारंभ’ या संकल्पनेवर विविध उपक्रमांचे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी (SIHS-COPT) तर्फे ‘आशावादी भविष्यासाठी आरोग्यदायी प्रारंभ’ या संकल्पनेवर आधारित जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कॅम्पस व परिसरात विविध … Read more

फरार माओवादी १५ वर्षांनंतर एटीएसच्या जाळ्यात

ताडीवाला रोडवरील प्रशांत कांबळे याला चऱ्होलीमधून अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरी भागात माओवादी विचारधारेचा प्रचार करण्यात गुंतलेला व ताडीवाला रोडवरून २०११ पासून बेपत्ता झालेला प्रशांत कांबळे ऊर्फ लॅपटॉप याला राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाने चऱ्होली परिसरातून अटक केली. ठाणे येथे दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात तो गेली १५ वर्षे फरार होता. गेल्या ६ … Read more

कोंढवा-येवलेवाडी कार्यालयाचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि गौरव सोहळ्यांचा एकत्रित उत्सव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कोंढवा : दिनांक १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच कोंढवा-येवलेवाडी कार्यालयाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व साजशीर पद्धतीने साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी कार्यालय व परिसराची स्वच्छता करून, फुलांची सजावट, रांगोळी, वीज रोषणाई यांसह संपूर्ण परिसर सुशोभित करण्यात आला … Read more