आवृत्ती , पुणे

केवायसी अपडेटसाठी डीआरडीओच्या कर्मचाऱ्याला पाठवली एक फाईल

डाउनलोड करताच गमावले १३ लाख रुपये महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे ; गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सायबर गुन्हेगार विविध प्रकारे सामान्यांपासून उच्च शिक्षित व्यक्तींची ऑनलाईन फसवणूक करत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. अशातच पुण्यात एक सायबर फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे, ज्यात एका व्यक्तीची १३ … Read more

मंत्रालयात आता सहज प्रवेश नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंत्रालय प्रवेशासाठी फेस आयडी आणि क्यूआर कोड प्रणाली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : मंत्रालयातील सुरक्षा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता कुणालाही सहजासहजी मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही. मंत्रालय सुरक्षा आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “यापुढे मंत्रालयात फेस आयडीद्वारेच प्रवेश मिळेल. ज्या मजल्यावर काम … Read more

महसूल विभागाचा क्रांतिकारी निर्णय

आता वाळू माफियांना बसणार आळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई ; राज्यातील वाळूमाफियांना वेसण घालण्यासाठी फडणवीस सरकारनं मोठे पाऊलउचलले आहे. गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार फक्त आहेत. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांऐवजी थेट जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागाचा हा मोठा निर्णय आहे. राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाने ठोस पावले उचललली … Read more

पुणे महापालिकेचा ‘स्वैर’ कारभार! पर्यावरणपूरक प्रकल्प धारकांवर प्रशासनाचा ‘तगादा’

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे: नगरसेवक नसल्याने पुणे महापालिकेच्या प्रशासनाचा कारभार ‘स्वैर’ झाल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. एकीकडे पर्यावरण आणि स्वच्छतेसाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आणि गांडुळ खत प्रकल्प राबवणाऱ्या मिळकत धारकांवर अर्ज मागवून तगादा लावला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने … Read more

पोलीस चौकीत पोलिसांना शिवीगाळ करणार्‍या तरुणावर गुन्हा

नववर्षाच्या मध्यरात्री शनिवार पेठ पोलीस चौकीतील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे ; नववर्षाच्या रात्री तरुणीच्या मोपेडला अपघात केल्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस चौकीत आणले. तेथे ड्रंक अँड ड्राईव्हची चाचणी देण्यास नकार देऊन तरुणाने पोलिसांनाच शिवीगाळ करुन गोंधळ घातला. विश्रामबाग पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अथर्व जोशी (वय २२, रा. नारायण पेठ) असे या गोंधळ घालणाऱ्या … Read more

अर्धवट दरवाजा उघडा ठेवण्याची खोड नडली

चोरट्याने घरात शिरुन लॅपटॉप, ४ मोबाईल, रोकड केली लंपास महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्यात आलेले तरुण-तरुणी भाड्याच्या खोलीत राहतात. प्रत्येकाची जाण्या-येण्याची वेळ वेगळी असल्याने अनेकदा दरवाजा फक्त लोटून ठेवला जातो किंवा बाहेर गेलेला कोणी परत दरवाजा लावत नाही. याचाच गैरफायदा घेऊन चोरटे अशा घरात घुसतात आणि हाताला लागणाऱ्या वस्तू लांबवतात. अशाच … Read more

टास्कच्या नावाखाली तिघांची २४ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांच्या आमिषाला पडताहेत बळी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रेटिंग देण्याचे टास्क देऊन त्यावर किरकोळ परतावा देत विश्वास संपादन करून, त्यानंतर पैसे भरायला लावून दोन महिलांसह तिघांची २४ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे वर्षाच्या अखेरच्या दिवशी समोर आले आहे. घरबसल्या पार्ट-टाईम कामाच्या नावाखाली लोकांना टास्क दिले जातात. सुरुवातीला रेटिंग देण्यास सांगून त्यावर लगेच … Read more

शेतकऱ्याकडून खंडणी मागणाऱ्यास कात्रजमध्ये अटक

खंडणी विरोधी पथकाची प्रभावी कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोशी येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांकडे खंडणी मागून दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कात्रजमधून अटक केली आहे. तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आरोपी अनिकेत भरत उतळे (वय १९, रा. श्रीराम कॉलनी, आदर्शनगर, मोशी) याला व दोघा अल्पवयीन मुलांना भारती विद्यापीठ हॉस्पिटलसमोरील … Read more

रिक्षाचालकाला निर्जन स्थळी नेऊन मारहाण करुन लुबाडले

पुणे स्टेशन येथील वाहनतळावरील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रिक्षामध्ये प्रवासी म्हणून बसून रिक्षा निर्जन ठिकाणी नेल्यावर चालकाला शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने गुगल पेद्वारे पैसे जबरदस्तीने घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विष्णु मुन्ना चव्हाण (वय २०, रा. चाकण) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

रेल्वे स्थानकाच्या आवारात एक वर्षांची बालिका बेवारस अवस्थेत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात एक वर्षाची बालिका बेवारस अवस्थेत सापडली. बालिकेला बेवारस अवस्थेत सोडून पसार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकातील पार्सल विभागाच्या परिसरात बेवारस अवस्थेत बालिका आढळून आली. बालिका रडत … Read more