आवृत्ती , पुणे

अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांकडून १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून १८,५८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात ८,५८,०००/- रुपयांचा गुटखा आणि १० लाख रुपये किंमतीचे दोन टेम्पोचा समावेश आहे. दि. २० डिसेंबर २०२४ रोजी स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संजय भापकर यांना फालेनगर, … Read more

आता आंतरराष्ट्रीय उड्डाणे नव्या टर्मिनलवरून

आंतरराष्ट्रीय प्रवास होणार आणखी सुलभ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरून होणारी सर्व उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून होणार असून, याची अंमलबजावणी मंगळवार (दि. २४) पासून करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या विविध विभागाच्या … Read more

सोन्याच्या लोभासाठी अपहरणाचा बनाव करून केला खून

खून करणाऱ्या आरोपीला मोहोळ पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर – (मोहळ) : मोहोळ तालुक्यात एक निघृण गुन्हा उघडकीस आला आहे. कृष्णा नारायण चामे (वय ५२ वर्षे, रा. यल्लमवाडी, ता. मोहोळ) यांच्या अपहरणाचा बनाव रचून त्यांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कृष्णा चामे यांच्या … Read more

शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत मिळणार घर : शिवराज सिंह चौहान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास प्लस योजने अंतर्गत देशातील तसेच राज्यातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. पुण्यातील आयसीएआर अटारी, शिवाजीनगर येथे आयोजित किसान सन्मान दिवसाच्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमाला मुख्यमंत्री … Read more

बनावट नोटा वटविण्याचा प्रयत्न करणारा जेरबंद

जामनगरच्या तरुणाकडे आढळल्या ५०० व १०० रुपयांच्या बनावट नोटा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मेडिकलच्या दुकानात बनावट नोटा वटविण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुजरातमधील एका तरुणाला समर्थ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे ५०० व १०० रुपयांच्या ७७,१०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव गौरव रामप्रताप सविता (वय २४, रा. डिफेन्स कॉलनी, जामनगर, गुजरात) असे आहे. … Read more

भीमथडी जत्रेत चोरी करणारे चोरटे गजाआड

सीसीटीव्हीमध्ये झाले होते कैद, शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भीमथडी जत्रेत रविवारची सुट्टी असल्याने पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी एका महिला बचत गटाच्या स्टॉलवरुन ७१ हजार रुपयांची रोकड लांबविली. पण याची चोरी पचली नाही़ सीसीटीव्हीमध्ये यांची चोरी कैद झाली होती. पोलिसांनी या गर्दीतून चौघा चोरट्यांना पकडले. मनोज … Read more

मद्यधुंद डंपरचालकाने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले

केसनंद फाटा येथील मध्यरात्रीची घटना, तिघांचा मृत्यु महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अमरावती येथून कामाच्या शोधासाठी पुण्यात आलेल्या व फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना मद्यधुंद डंपरचालकाने चिरडले. त्यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यु झाला असून त्यात दोन बालकांचा समावेश आहे. पोलिसांनी डंपरचालकाला अटक केली आहे. ही घटना वाघोलीतील केसनंद फाट्यावर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. वैभवी रितेश पवार … Read more

ध्यान खुशहाल व समृद्ध जीवन का स्वर्णिम मार्ग

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया : ‘सूर्यदत्त’ द्वारा हर्षोल्लास से मनाया गया प्रथम विश्व ध्यान दिवस महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “आज की स्पर्धात्मक जीवनशैली में मानसिक तनाव, नींद न आना, भय जैसे मानसिक विकार बढ़ते जा रहे हैं। इन समस्याओं से निपटने के लिए मेडिटेशन (ध्यान) ही एकमात्र उपाय है। मन को शांत, तन … Read more

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश सचिव युवा उद्योगपती संतोष जैन यांच्या वतीने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून संतोष जैन यांनी जैन समाजामध्ये मोठे संघटन उभे केले आहे. अल्पसंख्याक विभागातील अनेक योजना त्यांच्यामुळे जैन समाजातील लाभार्थी पर्यंत पोहचत आहेत.

क्रोधावर विजय ही यशस्वी व्यापारी होण्याची गुरुकिल्ली

राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांचे प्रतिपादन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : क्रोध, काम आणि लोभ हे व्यापाऱ्यांसाठी घातक दुर्गुण असून, क्रोधावर विजय मिळवणे ही यशस्वी व्यापारी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांनी केले. दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे आयोजित “आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार २०२४” प्रदान सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. हा … Read more