आवृत्ती , पुणे

कृषी योजनांच्या लाभासाठी ‘अॅग्रिस्टॅक’ नोंदणी करणे बंधनकारक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ‘अॅग्रीस्टॅक’ योजना राबविण्यात येत आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) काढल्याशिवाय कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळणार नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक … Read more

मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत : जितेंद्र डुडी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मान्सूनपुर्व करावयाचे कामांचे सुक्ष्म नियोजन करुन ती सर्व कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करावीत, कामे करतांना सर्व सबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील तसेच त्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे … Read more

बसस्थानक परिसरात मोबाईल चोरणारे चोरटे गजाआड

स्वारगेट पोलिसांनी दोघांकडून १ लाख ८० हजार रुपयांचे १२ मोबाईल केले जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर येथील बसस्थानकावर होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपयांचे १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तुषार अर्विता लोखंडे (वय २०, रा. … Read more

बार्शी टेबल टेनिस अकॅडमीचा विभागीय स्पर्धेत उज्वल यश

विद्यार्थ्यांची पदकांवर मोहोर : प्रशिक्षक गणेश स्वामींचे मार्गदर्शन फलद्रूप महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ – बार्शी टेबल टेनिस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित वेस्टर्न महाराष्ट्र आणि कोकण विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत शानदार कामगिरी करत आपली ठसा उमटवला. ही स्पर्धा दिनांक २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी नवी मुंबई स्पोर्ट्स … Read more

आयएमसी सदस्य व भाजप नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

आचार्य विद्यासागर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन्मान समारंभ व माहितीपर बैठक संपन्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : आचार्य विद्यासागर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुम येथे आयएमसी सदस्य व भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी संस्था व आयएमसीच्या कार्यपद्धतीबाबत माहितीपर बैठकही घेण्यात आली. भुम येथील आचार्य विद्यासागर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयएमसी सदस्य … Read more

हाडोंग्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

51 वर्षांच्या परंपरेनुसार सामूहिक त्रिशरण पंचशील, मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांची रेलचेल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदाही मोठ्या उत्साहात व पारंपरिक श्रद्धेने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पूजन भागवत शिंदे (रिपाई, मराठवाडा उपाध्यक्ष) यांच्या हस्ते … Read more

प्रा. डॉ. तानाजीराव बोराडे यांना प्राध्यापक पदावर पदोन्नती

समाजशास्त्र विषयातील संशोधन कार्याची दखल; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : येथील शंकरराव पाटील महाविद्यालयात समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. तानाजीराव बोराडे यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्राध्यापक पदावर पदोन्नती दिली आहे. डॉ. बोराडे यांचे समाजशास्त्र विषयातील संशोधन, विविध शोधनिबंध लेखन, तसेच सामाजिक संशोधन … Read more

बसवेश्वरांच्या विचारांचे आचरणच खरी सामाजिक क्रांती – किरण कोरे

हाडोंग्री येथे बसवप्रतिष्ठानतर्फे बसवेश्वर जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : बसवप्रतिष्ठान, हाडोंग्री यांच्या वतीने सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून किरण कोरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महापुरुषांना डोक्यावर घेऊन … Read more

घरफोडीचे शतक केलेला ‘चोर राजा’ पुन्हा गजाआड

हडपसर पोलिसांची कामगिरी : तब्बल ३ महिने व ७०० किमीचा प्रवास, दोघा चोरट्यांसह सोनारालाही अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यात स्प्लेंडरवरून चोरटे येत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्यावरून हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तब्बल ३ महिने शहर व ग्रामीण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढला. रांजणगाव ते कात्रज या … Read more

तळेहिप्परग्यात हनुमान यात्रा डॉल्बीमुक्त वातावरणात संपन्न

मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग : शांततेत व पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक पार महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : पवन श्रीश्रीमाळ – सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे तळेहिप्परगा येथे ग्रामदैवत हनुमान देवाची यात्रा दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी डॉल्बी मुक्त वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर २४ एप्रिल रोजी किर्तन व भजनाचा कार्यक्रमही … Read more