आवृत्ती पुणे

चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी (दि. २४ रोजी) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी चंद्रकांत दादा पाटील यांनी पक्षातर्फे २ नामनिर्देशन पत्रे तर किशोर शिंदे यांनी १ नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. नामनिर्देशन पत्र सादर करताना पोलिस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता. गुरुवारी ही ५ उमेदवारांनी ६ नामनिर्देशन पत्रे नेली असून आतापर्यंत … Read more

कोथरूड मध्ये ज्येष्ठ नागरिक व दीव्यांग मतदारांमध्ये जनजागृती सुरू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. मतदारांमध्ये, विशेषतः ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांमध्ये, प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याबाबत तसेच मतदानाचा हक्क बजावण्याबाबत पुरेशी जागरूकता निर्माण होत आहे. कोथरूड मतदारसंघातील के.अनुसयाबाई खिलारे मॉडेल स्कूल, एरंडवणे, पुणे येथील … Read more

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम: राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गुरुवारी (दि. २४) सकाळी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे दर्शन घेऊन विधानसभेचा उमेदवारी अर्ज भूम येथील तहसील कार्यालयात दाखल केला. यावेळी महायुतीतील भाजप, अजित पवार गट घटक पक्षातील नेते व पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गाजावाजा न करता मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. … Read more

मन्ना जुगार खेळताना १० जणांना पकडले

बार्शी पोलिसांची कारवाई : साडेतीन लाखांची रोकड जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : धसपिंपळगाव रस्त्यावरील बायपास चौका नजीक पत्रा शेडच्या मागे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून बार्शी शहर पोलिसांनी तीन मोटारसायकली, ३,५०,१००/-रू रोख रक्कम ,व जुगार साहित्य, मोबाईल जप्त केले आहेत. पोलिसांनी दहा जणांना मन्ना जुगार खेळताना ताब्यात घेतले आहे. एकजण पळून गेला . … Read more

हायवेवरील टेम्पो चोरी करणारा जेरबंद

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हायवेवरील टेम्पो चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला जेरबंद करण्यात भारती विद्यापीठ पोलीसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ ऑक्टोबर रोजी नवले ब्रिजकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, राजमाता उद्यानाच्या शेजारी फिर्यादींनी त्यांचा टेम्पो लॉक करून पार्क केला होता. तो कोणीतरी चोरून नेला, अशी फिर्यादींनी … Read more

टोळक्याची दहशत, तरुणावर जीवघेणा हल्ला

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मित्राला मारल्याच्या कारणावरून एका टोळक्याने दोघांवर लोखंडी धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कर्वेनगर येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड रोडवर राहणाऱ्या एका तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.दि. २१ … Read more

रात्र गस्त घालत असताना मार्शलवर हल्ला

डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरात रात्र गस्त घालत असताना एका चोरट्याने पोलीस मार्शलवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन पोलीस ठाण्यात काम करणारे पोलीस हवालदार महेश तांबे यांनी फिर्याद दिली आहे. दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री २:३० वाजण्याच्या सुमारास अभिनव विद्यालय पथ, जानकी व्हिला … Read more

दुहेरी हत्याकांडांतील अडीच वर्षांपासुन फरार आरोपी केला जेरबंद

युनिट ६ गुन्हे शाखा पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुहेरी हत्याकांडातील अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात युनिट ६ गुन्हे शाखा पोलीस पथकाला यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, दि. २२ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखा युनिट ६ … Read more

अपहृत मुलाची पोलिसांनी अर्ध्या तासात सुटका

बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : लातूर येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण करून जाणाऱ्या टोळीला बार्शी तालुका पोलीस ठाणेच्या सतर्क पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात जेरबंद करण्याची कामगिरी केली आहे. पोलिसांनी बार्शी बायपास रस्त्यावर नाकाबंदी करत चार जनांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे गांधी चौक, लातुर हद्दीतील अल्पवयीन मुलगा वय … Read more