आवृत्ती पुणे

सोलापूरच्या पोलीस अधीक्षकपदी अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे.तर धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने हे बदल्याच्या आदेश काढले आहेत.राज्याच्या गृह विभागाने भापोसे, रापोसे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले … Read more

लोणीकंदचा गावठी दारु विक्रेता दीड वर्षा करीता तडीपार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार गावठी हातभट्टी दारुविक्री करणारा सराईत गुन्हेगार शामकांत विष्णु सातव, (वय ३९, रा. आव्हाळवाडी रोड डोमखेल वस्ती वाघोली ता. हवेली) यास पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४, पुणे शहर यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यातुन दीड वर्षाकरीता तडीपार केले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील आव्हाळवाडी, वाघोली तसेच आसपासच्या भागात दहशत … Read more

आदर्शनगर सोसायटीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आदर्शनगर सोसायटी, मार्केट यार्ड, येथे 15 ऑगस्ट च्या शुभदिनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सोसायटीचे सर्व सभासद व कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले होते. या निमित्ताने महेश नामपूरकर, मिलिंद भोंडे,  नरेंद्र चौबळ,  आणि अभय संचेती यांचा उत्कृष्ठ कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम प्रमुख पाहुण्या माजी नगरसेविका राजश्री … Read more

रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या

कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये घरफोडी तसेच चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत व सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीत शटर उचकटुन चोरी केलेल्या आरोपीस अटक करण्यात कोंढवा तपास पथकास यश आले आहे. कोंढवा पोलीस … Read more

११.५० लाख रुपये किंमतीचे हरवलेले मोबाईल हस्तगत

शिवाजीनगर पोलीस स्टेशन सायबर पथकाची धडाकेबाज कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेलेले ११.५० लाख रुपये किंमतीचे एकुण ५३ मौल्यवान मोबाईल फोन पुणे शहर, विविध जिल्ह्यातुन तसेच विविध राज्यातून हस्तगत करुन तक्रादारदार यांना परत करण्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन सायबर पथकास यश आले आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर सहायक पोलीस निरीक्षक … Read more

गॅस कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून फसवणूक

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : गॅस कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांचा मोबाईलचा अॅक्सेस घेवून १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अनोळखी युवकाने फिर्यादिशी संपर्क साधला. गॅस कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांचा मोबाईलचा अॅक्सेस मागितला. गॅस कंपनी कडून … Read more

आयपीओत गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आयपीओ मध्ये गुंतवणुक केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडून १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कोंढवे धावडे परिसरात घडला आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ३ मे ते ४ जुलै दरम्यान … Read more

पायी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : कोथरूडच्या मयुर कॉलनी रोडवर सेन्ट्रल बँकेच्या गेट समोर चालत जाणाऱ्या एका ७० वर्षय महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. त्याची किमत सुमारे ३ लाख रुपये आहे. या महिलेने आरडा ओरडा केला पण चोरटे पळून गेले. मंगळवारी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास ही घटना घडली. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर कोथरूड पोलीस … Read more

हडपसर व वानवडीतील ८ गुन्हेगार तडीपार

पोलीस आयुक्त यांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरपरिमंडळ ५ हडपसर व वानवडी कार्यक्षेत्रांतील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ८ गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त यांच्या  आदेशानुसार तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारावर ठोस  कारवाई करण्यासाठी आदेश दिलेले होते. नमूद आदेशांप्रमाणे परिमंडळ ५ कार्यक्षेत्रांतील … Read more

पोलिस मित्र संघटनेचा ३७ वा वर्धापन दिन पुण्यात उत्साहात साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पोलिस मित्र संघटना(महाराष्ट्र राज्य)चा ३७ वा वर्धापन दिन पुण्यात साजरा झाला. त्यानिमित्त पुण्यात आयोजित विशेष कार्यक्रमात पोलीस दलातील आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.