आवृत्ती , पुणे

सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

कोंढव्यातील घटना, अडीच महिन्यांनंतर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सावत्र वडिलांकडून होत असलेल्या मारहाणी आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी तब्बल अडीच महिन्यांनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संदीप ऊर्फ शब्बीर इब्राहिम शेख (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव … Read more

पीन नंबर टाकला अन खात्यातून गेले १३ लाख

मुदत ठेवीवरही ओव्हरड्राफ्ट करुन काढली रक्कम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ज्येष्ठ नागरिकाला बँकेचे केवायसी करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून त्यावर डेबिट कार्डचा पिन टाकायला सांगितला. त्यांनी पिन नंबर टाकल्याबरोबर काही मिनिटात ४९ व्यवहार करुन त्यांच्या खात्यावरुन तब्बल १३ लाख ३२ हजार ५९६ रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करुन फसवणूक करण्यात आली. याबाबत मयूर कॉलनीत राहणार्या ६९ … Read more

येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये मारामारी

दोघांनी एका कैद्याला मारहाण करुन केले जखमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चेष्टा मस्करी करताना झालेल्या वादातून दोघा कैद्यांनी खुनाचा आरोपाखालील कैद्याला बेदम मारहाण केली. कैद्याच्या बरगडी व नाकावर ठोसा मारल्याने तो जखमी झाला आहे. सुधीर गौतम थोरात असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत तुरुंगाधिकारी कारागृह रक्षक विश्वास नरहरी वाकडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात … Read more

तडीपार गुंडासह दोन साथीदारांना अटक

रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळी बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना मारहाण करून लुटणाऱ्या तडीपार गुंडाला त्याच्या दोन साथीदारांसह लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत चोरीला गेलेल्या दोन मोटारसायकली व मोबाईलसह ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. छोट्या ऊर्फ अभिषेक शिवाजी आल्टे (वय २३, रा. बाबाजान चौक, … Read more

पुणे जिल्हा लोक अदालतमध्ये राज्यात पुन्हा अव्वल

366 कोटी तडजोड रक्कम जमा 87 हजार 486 प्रकरणे निकाली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे, 16 डिसेंबर:- शनिवारी (14 डिसेंबर) रोजी पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील ४थ्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला आहे. लोकअदालतमध्ये दाखल करण्यात आलेल्या एकूण प्रकारणांपैकी सुमारे 87 हजार 486 प्रकरणे निकाली काढण्यात आली तर 366 कोटीहून … Read more

सायबर चोरट्यांनी महिलेला १९ लाखांना गंडा

सोने तारण ठेवून कर्ज काढले : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सायबर गुन्हेगारांनी शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने पाषाण येथील ४१ वर्षीय महिलेला तब्बल १९.६६ लाख रुपयांना फसवले. हुंडाई कंपनीचा आयपीओ (IPO) लागल्याचा बहाणा करत त्यांनी महिलेकडून सोने तारण ठेवून कर्ज घेत पैसे जमा करायला लावले. मात्र, ना त्यांना हुंडाईचे शेअर्स मिळाले, ना … Read more

वाय.सी.एम. रुग्णालयाजवळ ‘आनंदाकि रोटी’ उपक्रम

रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन सेवा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड येथील वाय.सी.एम. रुग्णालयाच्या गेटवर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दर सोमवारी ‘आनंदाकि रोटी’ या नावाने मोफत भोजन उपक्रम राबवला जात आहे. हा उपक्रम मागील दोन वर्षांपासून सुरू असून, तो संयमलताजी म. सा. आणि सुमन प्रभाजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे चालवला जात आहे. या उपक्रमामध्ये विक्रम छाजेड, … Read more

दरोडा टाकणार्‍या चोरट्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध

मुंढव्यात सराफ व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लूट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंढवा येथील बी.टी. कवडे रोडवरील अरिहंत ज्वेलर्समध्ये सराफ व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवत लुटणाऱ्या दोन चोरट्यांची रेखाचित्रे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. ही घटना ८ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली होती. फिर्यादी वालचंद आचलदास ओसवाल (वय ७७) हे रात्री दुकानात दिवसभराचा हिशेब लिहित बसले … Read more

पुणे जिल्हा लोकअदालतमध्ये राज्यात पुन्हा अव्वल

366 कोटी तडजोड रक्कम जमा : 87 हजार 486 प्रकरणे निकाली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील चौथ्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला आहे. लोकअदालतमध्ये दाखल करण्यात आलेल्या एकूण प्रकारणांपैकी सुमारे 87 हजार 486 प्रकरणे निकाली काढण्यात आली तर 366 कोटीहून तडजोड रक्कम जमा करण्यात … Read more

डोक्यात सिलेंडर घालून मजुराचा खून

दारु पिताना वाद; आळंदीतील काळेवाडी येथे घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे – दारू पिताना झालेल्या वादातून एका मजुराचा डोक्यात सिलेंडर घालून खून करण्यात आला. आळंदीतील काळेवाडी येथे घडलेल्या या घटनेत दिघी पोलिसांनी गणेश खंदारे (वय २३) याला अटक केली आहे. संतोष शंकर खंदारे (वय ४५, रा. काळेवाडी, धाकट्या पादुका मंदिराजवळ, आळंदी) असे खून झालेल्या व्यक्तीचे … Read more