HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
अकलुजच्या शेतातील गोठ्यात ९ दिवस डांबले : १२ गुंतवणूकदारांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सोलापूर, अकलुज परिसरात शेकडो लोकांना ‘बुल्स कॅपिटल’मार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची १२०० कोटींची फसवणूक करणाऱ्या इम्रान चौधरीचे काही जणांनी अपहरण करून अकलुजच्या शेतात ९ दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी … Read more
सिंबायोसिसच्या एमबीएला प्रवेशासाठी संस्थेच्या एचआरकडे मागितले २० लाखांचे डोनेशन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सिंबायोसिस संस्थेच्या एमबीएमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली संस्थेच्याच एचआर प्रमुखाकडे २० लाखांचे डोनेशन मागण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले चार महिने फरार असलेल्या एका व्यक्तीस पुणे पोलिसांनी कोलकत्ता विमानतळावर पकडले. तो पत्नीसह थायलंडला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील ‘उमेद सावित्री’ या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटाच्या विक्री दालनाचे उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, रोजगार हमी … Read more
विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप, सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, आकुर्डी येथे पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे होते. उपप्राचार्या डॉ. शिल्पा चौधरी, शैक्षणिक … Read more
सत्कार समारंभात मान्यवरांची उपस्थिती, नव्या नेतृत्वाचे स्वागत महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : विद्या विकास पाथरुड सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा. डॉ. नितीन पडवळ आणि उपाध्यक्षपदी प्रा. गंगाधर काळे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. या यशस्वी निवडीच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्या विकास मंडळ, पाथरुडचे उपाध्यक्ष डी. … Read more
स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. पवनकुमार वानखडे यांचे मोलाचे मार्गदर्शन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्यातील एमबीए व एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-सीईटी २०२५ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करत महाविद्यालयाचा सन्मान वाढविला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये श्रेणिक डुंगरवाल (९२.२४ … Read more
वाघोलीतील मोझे कॉलेजमधील प्राध्यापकांसह सिनिअर विद्यार्थ्यांना अटक : गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाघोली येथील पार्वतीबाई गेणबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयात अवघड पेपर गेलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना दुपारचा पेपर पहाटे पुन्हा लिहिण्यास दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारप्रमाणे परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या या चौघांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली … Read more
बार्शी पोलीस विभागाला निरोप देत नव्या जबाबदाऱ्यांकडे वाटचाल महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि शिस्तप्रिय सेवाभावाने बार्शी पोलीस विभागात आपली ठसठशीत छाप सोडणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) सोमनाथ बाजीराव जगताप यांची अलीकडेच प्रशासकीय बदल्यामुळे नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे त्यांचा सन्मान व निरोप समारंभ उत्साहात पार … Read more
उत्तर प्रदेशातून चोरी करण्यासाठी यायचे विमानाने : खडकी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून पुण्यात विमानाने येऊन, ज्येष्ठ नागरिकांना एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याचा बहाणा करून त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्या दोघा चोरट्यांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे. नियाज इजाज मोहम्मद (वय २९) आणि सावेज सलीम अली (वय … Read more