आवृत्ती , पुणे

खुनाचा प्रयत्न केल्यानंतर फरार दोन आरोपींना पकडले

चतुःश्रृंगी पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खुनाचा प्रयत्न केल्यानंतर फरार झालेल्या दोन आरोपींना दीड वर्षानंतर पकडण्यात चतुःश्रृंगी पोलीस व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला यश आले आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात दीड वर्षांपासून फरार असलेले आरोपी १) हरीश उर्फ हरी रविंद्र सावळे (वय २३ … Read more

टास्कच्या बहाण्याने सात लाखांची फसवणूक

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन माध्यमातून टास्कच्या बहाण्याने सात लाखांची फसवणूक झाल्याची घटना मोहमदवाडीत घडली आहे. या प्रकरणात एका तरुणाने तक्रार दाखल केली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ जून ते १८ जुलै या कालावधीत घडली आहे. ऑनलाईन माध्यमातून फिर्यादींच्या … Read more

गुंतवणूकीच्या बहाण्याने ३१ लाखाची फसवणूक

वानवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन माध्यमातून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीतून नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ जुलै ते २९ ऑगस्ट या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींना अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधला. … Read more

एटीएम कार्ड बदलून ५० हजार रुपयांची फसवणूक

स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पैसे काढण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलून एका व्यक्तीचे ५० हजार रुपये काढून फसवणूक करण्याचा प्रकार टिळकरोड येथे घडला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भारतीय स्टेट … Read more

मेट्रो स्टेशनवर तरुणाला लुटले

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर आंबेगाव येथील एका तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी तीन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव येथील तरुण बुधवारी (दि. ११) दुपारी दीडच्या सुमारास … Read more

पोलीस ठाण्यातच आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

शिक्रापूर पोलीस ठाण्यात घडली घटना : मोबाईल चोरला म्हणून आणले होते पकडून महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शिक्रापूर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला नागरिकांनी पकडून आणल्यानंतर, गुन्हा दाखल केला तर मी जीव देईल, असे म्हणून खिडकीवर डोके आपटून एका आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. परमेश्वर नागनाथ धेवडे असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी … Read more

पिंपरीत प्रियकराकडून प्रेयसीची हत्या

रिक्षात मृतदेह टाकून ठेवला आईच्या घरासमोर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेयसीचा गळा आवळून, मृतदेह तिच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान काळेवाडी स्मशानभूमीजवळ घडली आहे. शिवानी सोमनाथ सुपेकर (वय २७, रा. जगताप नगर, थेरगाव) असे गळा आवळून हत्या … Read more

गांजा विक्री करताना दोघांना केले जेरबंद

लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकाळभोर येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात यश आले आहे. त्यांच्या कडून ३८ किलो ८७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत अमली पदार्थांशी संबंधित पेट्रोलिंग करीत … Read more

पेट्रोल, डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

लोणीकाळभोर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अवैधरित्या पेट्रोल, डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून ४८ लाख ०१ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात लोणीकाळभोर पोलिसांना यश आले आहे. डिझेल चोरीचा शोध घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस अंमलदार ढमढेरे, शिवाजी जाधव गस्त घालीत होते. त्यावेळी … Read more

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

चतुःश्रृंगी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गाड्यांची तोडफोड व कोयत्याने मारहाण प्रकरणी दाखल मोक्का गुन्ह्यातील १८ महिन्यांपासून फरारी असलेल्या सराईत आरोपीला चतुःश्रृंगी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १७ एप्रिल २०२३ रोजी मध्यरात्री पीएमसी कॉलनी, पांडवनगर, पुणे येथील सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड करून सोनू … Read more