आवृत्ती , पुणे

बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या युवकावर कारवाई

मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखाच्या पथकाने बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या युवकावर कारवाई करत त्याला अटक केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेतील सर्व पोलीस आधिकारी व पोलीस अंमलदार यांची बैठक घेवुन बेकायदेशीर शस्त्रे बाळगणारे यांच्यावर प्रभावीपणे कारवाई करण्याबाबत व मोहीम राबविणेबाबत सुचना दिल्या … Read more

टिंगरेनगर परिसरात गुन्हे शाखेकडून 1 कोटीचे मेफेड्रोन जप्त

पोलिसांचा छापा : सापळा रचून तिघांना अटक पुणे : पोलिसदलातील गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने विश्रांतवाडीतील टिंगरेनगर परिसरात छापा टाकून एक कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आणि तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवास संतोष (वय २१, रा. धानोरी), रोहित शांताराम बेंडे (वय २१, रा. लोहगाव), निमिश सुभाष अबनावे (वय २७, रा. टिंगरेनगर, … Read more

कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून १३ लाखांची फसवणूक

भारती विद्यापीठ आणि हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून दोघांची १३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि हडपसर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक माहितीनुसार, कात्रज परिसरात राहणाऱ्या प्रदीप दिनकर बारडे (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिचार्जचे … Read more

विश्रामबाग पोलिस कोठडीतील आरोपीचा चक्कर आल्याने मृत्यू

गुन्ह्याचा तपास सीआयडी करणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला शनिवारी (दि.१० ऑगस्ट) पोलिस कोठडीत चक्कर आल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कोठडीत झालेल्या मृत्यूमुळे गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला आहे. सचिन अशोक गायकवाड (वय ४७, रा. मुंढवा) असे … Read more

उपबाजार व्यापार संकुल उभारणीस मदत करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा बाजार समितीच्या उपबाजार संकुलाचे भूमिपूजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा : सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कै. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या नावाने भव्य उपबाजार व्यापारी संकुल १५ एकर जागेवर  १३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहे. या संकुलात शेतकरी, व्यापारी, हमाल व ग्राहक यांच्यासाठी सर्व सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. या संकुलाच्या उभारणीसाठी शासनाकडूनही … Read more

उरुळी कांचन येथे टेम्पोची ट्रकला धडक, मुलाचा मृत्यू

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन येथे सिमेंटच्या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जात असताना टेम्पोने पाठीमागून ट्रकला धडक दिली. या अपघातात केडगाव (ता. दौंड) येथील १५ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघात उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत तळवाडी चौकातील कांचन स्वीट समोर रविवारी (ता. ११) सकाळी सात … Read more

मराठा आरक्षण मिळे पर्यंत मागे हटायचे नाही , मीही हटणार नाही

मनोज जरांगे पाटील यांचे कात्रजमध्ये जल्लोषात स्वागत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कात्रज : आता मागे हटायचे नाही, मराठ्यांची एकी काय असते,ते कात्रजकरांनीदाखवून दिले आहे. आरक्षण मिळेपर्यंत मी मागे हटणार नाही, तुम्हीही हटू नका. मी समाजासाठी माझा जीव पणाला लावलाय. राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी आता मुंबईला धडक मारावीच लागेल,असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कात्रज … Read more

बॅडमिंटनपटू पद्मभूषण सायना नेहवालला ‘एसजीबीएफ’तर्फे ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमच्या वतीने प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पद्मभूषण सायना नेहवाल हिला सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तिला या पुरस्काराने विशेष सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने यांना देण्यात आला होता. नवी दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन व सूर्यदत्त … Read more

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा १६ ऑगस्टपासून संपाचा इशारा

रक्षा बंधनापूर्वी लाडकी बहिण योजनेचे काम ठप्प होणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क  पुणे : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी १६ ऑगस्टपासून संपाचा इशारा दिला आहे.त्यामुळे शासनाच्या बहु चर्चित लाडकी बहिण योजनेला धक्का बसणार आहे. १९ तारखेला रक्षाबंधन असून तत्पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँकखात्यात पैसे कसे जमा होणार,असा प्रश्न बहिणींना पडला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायतीशी संबंधित सरपंच, ग्रामसेवक, … Read more

खोटी आश्वासने देऊन महाराष्ट्राची फसवणूक करणाऱ्या सरकारला हद्दपार करा

हडपसर येथील सभेत जयंत पाटील यांचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महागाई, बेरोजगारी, व विविध समस्यांनी महाराष्ट्र ग्रस्त असून, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पगारी युवक कामाला लावले जाणार आहेत, फसवे सरकार हद्दपार करून महाविकास आघाडी सरकार राज्यात आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी … Read more