आवृत्ती पुणे

पुणेकरांसाठी महत्त्वाची घोषणा: वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय

१२ हजार कोटींच्या नवीन रस्त्याचा प्रस्ताव, रोजगाराची संधीही वाढणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: पुणे महानगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरूर-खेड-कर्जत-पनवेल हा नवीन रस्ता प्रस्तावित केला आहे. या रस्त्याच्या कामासाठी १२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या संदर्भात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माहिती दिली. भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभागाची … Read more

सराईत वाहनचोराकडून मोटारसायकल हस्तगत

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज चौकातील रसवंतीगृह दुकानासमोरील बाजूस पार्क केलेली गाडी चोरी करणाऱ्या सराईत वाहनचोराला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडून ही मोटारसायकल जप्त केली आहे. मिथुन सुगंध लोखंडे (वय २२, रा. महात्मा गांधी सोसायटी, सहकारनगर) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. कात्रज येथील रसवंतीगृहासमोर रस्त्यावर यामाहा मोटारसायकल १६ एप्रिल … Read more

वरुडे पाटील यांना माऊली समाजभूषण पुरस्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : समस्त ग्रामस्थ कोंढवा बुद्रुक वासिय व बधे इन्स्टिट्यूट संचालित माऊली प्रतिष्ठान यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल विठ्ठलराव वरुडे पाटील यांना माऊली समाज भूषण पुरस्काराने शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. माय माऊली केअर सेंटर पुणे व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, या सामाजिक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरूडे … Read more

कोंढव्यात वाहनांची तोडफोड करून माजवली दहशत

गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाची कारवाई : गुलटेकडीतील चौघा गुंडांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी कोंढव्यात आलेल्या चार तरुणांनी पहाटेच्या सुमारास परिसरात ९ वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने २४ तासांत चौघांना अटक केली आहे. कोंढवा परिसरातील लक्ष्मीनगर येथे १६ एप्रिल रोजी पहाटे साडेचार … Read more

यू.एस. पोलो कंपनीचे बनावट शर्ट विकणाऱ्या दुकानावर छापा

हडपसर पोलिसांनी ४ लाख रुपयांचे ५१० शर्ट केले जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : यू.एस.पी.ए. (यू.एस. पोलो असो.) या ब्रँडेड कंपनीचे बनावट शर्ट विकणाऱ्या दुकानावर हडपसर पोलिसांनी छापा टाकून तेथून तब्बल ४ लाख ८ हजार रुपयांचे ५१० बनावट शर्ट जप्त केले आहेत. याबाबत मंगेश जगन्नाथ देशमुख (वय ४५, रा. वारजे माळवाडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात … Read more

कृतिशील परंपरेचा आदर्श हाच संस्कृतीचा आधार : संप्रसाद विनोद

ल. म. क़डू, शाहीर हेमंत मावळे, हसबनीस आदींचा कर्तृत्वरत्न पुरस्काराने गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : संपन्नता, भावसंपन्नता आणि संवेदनशीलताच कुटुंबाची परंपरा टिकवू शकते आणि आपल्याला एक नवी ऊर्जा देऊ शकते. कृतीशील परंपरेचा आदर्श हाच आपल्या संस्कृतीचा आधार आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आत्मयोगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आचार्य डॉ. माधव … Read more

उधारी वसूल करण्यासाठी दिलेला चेक वटवला

चिडलेल्या शेजाऱ्याची किराणा दुकानदाराला बेदम मारहाण : दुकानात तोडफोड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उधारीच्या रकमेची परतफेड होत नसल्यामुळे एक किराणा दुकानदाराने मोटारसायकल विक्रीच्या वेळी घेतलेला चेक वटवला. त्यामुळे संतापलेल्या शेजाऱ्याने दुकानदाराला बेदम मारहाण केली आणि दुकानातील वस्तूंची तोडफोड केली. ही घटना हडपसर परिसरातील मोरे वस्ती येथे १५ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. वैभव ज्ञानदेव चव्हाण … Read more

डांबर खरेदीतून ठेकेदारांना बाहेरचा रस्ता

थेट उत्पादकांकडून खरेदीचा महापालिकेचा मोठा निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेतील डांबर खरेदीसंबंधीच्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ठेकेदारामार्फत डांबर खरेदी न करता, थेट उत्पादक कंपन्यांकडूनच डांबर खरेदी केली जाणार आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशीही सुरू असून लवकरच चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त … Read more