आवृत्ती , पुणे

१५ वर्षांच्या मुलाने घरातून चोरले १ लाख ४० हजार रुपयांची मोहनमाळ

९ वर्षांनी मोठ्या तरुणीबरोबर मजा करण्यासाठी केली चोरी : आंबेगावमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आपल्यापेक्षा ९ वर्षांनी मोठ्या तरुणीच्या सांगण्यावरून मजा करण्यासाठी १५ वर्षाच्या मुलाने आपल्याच घरातून आजीची १ लाख ४० हजार रुपयांची सोन्याची मोहनमाळ चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत आंबेगाव येथील एका ५४ वर्षाच्या नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

टिळक रोडवरील दुकानात शिरली कार

वाहनचालक परवाना नसलेल्या १९ वर्षाच्या तरुणाचे कृत्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाहनचालक परवाना नसताना पहाटेच्या वेळी टिळक रोडवरून भरधाव जाणाऱ्या १९ वर्षाच्या तरुणाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अत्यंत वेगाने ही कार विरुद्ध बाजूच्या फुटपाथवर चढून दुकानाच्या शटरला धडकली. ही धडक इतकी वेगाने झाली की दुकानाचे शटर तुटले. आतील काचा फोटल्या आणि दुकानातील २८ फ्रीजचे … Read more

बंदी असतानाही पुण्यात नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरूच

पोलिसांनी एकाच दिवशी ९ ठिकाणी कारवाई करून हजारोंचा मांजा केला जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नायलॉन मांजामुळे दुचाकीचालकांच्या गळ्याला जखम होऊन त्यात त्यांच्या जीवावर बेतले आहे. शहरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. पक्षांच्या पायात हा मांजा अडकून त्यात त्यांचा जीवही जातो. अग्निशामक दलाकडील नोंदीनुसार पुण्यात गेल्या ५ वर्षांत ४ हजार ८२ पक्षी मांजामध्ये अडकलेले … Read more

जमिनीच्या वादातून बदला घेण्यासाठी पिस्टल बाळगले

मध्यस्थासह दोघांना अटक, एक पिस्टल व एक काडतुस जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जमिनीच्या वादातून चुलत मामाने जीवे मारण्याची धमकी दिल्याने तरुणाने बदला घेण्यासाठी पिस्टल बाळगले होते. गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पिस्टल व एक काडतुस जप्त केले. ज्याच्या मध्यस्थीने हे पिस्टल विकत घेतले … Read more

सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त

कात्रज रोडवर गुन्हे शाखेच्या युनिट २ कडून कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करून गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत. सोहम शशिकांत वाघमारे (वय २०, रा. तळजाई वसाहत, सहकारनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ११ जानेवारी रोजी गस्त घालत … Read more

८३ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक जण अटकेत

हडपसर परिसरातून अफूच्या बोंड्यांचा चुरा जप्त; राजस्थानहून आणल्याचा संशय पुणे : हडपसर परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीकडून पुणे गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने ८३ हजार रुपयांचा अफूच्या बोंड्यांचा चुरा (पॉपीस्ट्रा) जप्त केला आहे. राजस्थानमधून हा चुरा आणल्याचा संशय आहे. सुमेरलाल गिरीधरलाल चौधरी (वय ३०, रा. बिग मार्ट शेजारी, चिंतामणीनगर, हडपसर, मूळ रा. … Read more

प्रतिबंधित नायलॉन मांजाचा साठा, बिबवेवाडी पोलिसांकडून तरुणाला अटक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर मनुष्य तसेच पक्षांसाठी जिवघेणा ठरतो. अशातच बिबवेवाडी पोलिसांनी धडक कारवाई करत प्लास्टिक नायलॉन आणि सिंथेटिक मांजाचा साठा ठेवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ५० रिळ मांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने … Read more

पुण्यात नन्हे गावात ड्रेनेजमध्ये दुचाकीस्वार पडला

नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या नन्हे गावात ड्रेनेज कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यांवर ड्रेनेज काम सुरू असल्याने काही ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. या भागात शैक्षणिक संस्था आणि खासगी कंपन्या असल्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने सतत वळवली जातात. दरम्यान, ड्रेनेज कामामुळे काही रस्ते … Read more

जुन्नरमध्ये उत्पन्नाचा बनावट दाखला देणारे रॅकेट उघड; पोलिसांची कारवाई

५०० रुपयांत १५ मिनिटांत बनावट उत्पन्नाचा दाखला तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तहसीलदारांच्या डिजिटल सहीचा बनावट उत्पन्नाचा दाखला फक्त ५०० रुपयांत अवघ्या १५ मिनिटांत तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. जुन्नर तालुका पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी विनोद चंद्रकांत बिडवई (रा. जुन्नर) याच्यावर गुन्हा … Read more

पैसे न दिल्याने लाकडाने मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यु

राजेंद्रनगरमधील घटनेत खुनाचा गुन्हा दाखल, एकाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारु पिऊन घरी आलेल्या तरुणाने घेतलेले पैसे न दिल्याने त्याला लाकडाने मारहाण करुन जखमी केले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला. विश्रामबाग पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. मन्या सोनवणे (रा. एसआरए बिल्डिंग, राजेंद्रनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आनंद … Read more