आवृत्ती , पुणे

पुणे जिल्हा लोकअदालतमध्ये राज्यात पुन्हा अव्वल

366 कोटी तडजोड रक्कम जमा : 87 हजार 486 प्रकरणे निकाली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील चौथ्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला आहे. लोकअदालतमध्ये दाखल करण्यात आलेल्या एकूण प्रकारणांपैकी सुमारे 87 हजार 486 प्रकरणे निकाली काढण्यात आली तर 366 कोटीहून तडजोड रक्कम जमा करण्यात … Read more

राज्यात थंडीची लाट पुणेकर गारठले, किमान तापमान ७.८ अंश सेल्सिअस

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण राज्यात थंडीची लाट आली आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान सिंगल डिजिट राहिले असून या हंगामातील निच्चांकी तापमान ७.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. डिसेंबर महिन्यात पुण्यात आतापर्यंतचे निच्चांकी सर्वात कमी किमान तापमान ३.३ अंश सेल्सिअस २७ डिसेंबर १९६८ रोजी नोंदविले गेले … Read more

सराफी दुकानात खरेदीच्या बहाण्याने चोरी करणारा गजाआड

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : चार गुन्हे उघड, ३ लाख ६४ हजारांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सराफी दुकानात खरेदीचा बहाणा करुन नजर चुकवून सोनसाखळी, अंगठी असे दागिने चोरुन नेणार्‍या चोरट्याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. कपिल जयराम चव्हाण (वय ३९, रा. रामचंद्र स्मृती बिल्डिंग, शास्त्रीनगर, कोथरुड) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून … Read more

जनतेच्या प्रश्नाची जाण असणारा राकेश नवगिरे

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : सोलापूर रोडवरील शंतनु मोटर्स समोरील पाईपलाईन लिकेज गेल्या नऊ महिन्यांपासून प्रलंबित होती. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते आणि गटाराच्या पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. या पाईपलाईन लिकेजच्या समस्या सोडवण्यासाठी युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश नवगिरे यांनी प्रशासनाला निवेदन दिले होते आणि आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. … Read more

उधार चहा देण्यास नकार दिल्याने गुंडाचा राडा

पान शॉप, अंडाभुर्जी गाड्यांची तोडफोड : लोहगावातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चहा उधारीवर न दिल्याने एका गुंडाने लोहगावमध्ये पान शॉप आणि अंडाभुर्जी गाडीवरील साहित्याची तोडफोड केली. विमानतळ पोलिसांनी मोक्का कारवाई झालेल्या या गुंडाला अटक केली आहे. अक्षय संजय सगळगिळे (वय २०, रा. संतनगर, लोहगाव) असे या गुंडाचे नाव आहे. अक्षय सगळगिळे आणि रोहन … Read more

हातचलाखी करत भामट्याने महिलेला घातला गंडा

कर्वेनगरमधील बँक ऑफ बडोदामधील घटना : सीसीटीव्हीत भामटा कैद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बँकेतून पैसे काढल्यानंतर ते मोजत असताना भामट्याने पैसे असे मोजायचे असतात, असे म्हणून महिलेच्या हातातून पैशांचे बंडल घेत मोजून दाखविण्याचा नाटक करत हातचलाखी करुन दोन बंडलातून २३ हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वारजेमधील ४६ वर्षाच्या महिलेने वारजे … Read more

सराईत गुन्हेगार अंमली पदार्थाच्या तस्करीत सक्रिय

पुण्यात ३ लाखांचा गांजा घेऊन येताना अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दहशत माजविणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने मोक्काची कारवाई यापूर्वी झालेल्या सराईत गुन्हेगाराकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३ लाख रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे. सहजरित्या मोठा माल मिळत असल्याने शरीराविरुद्ध गुन्हे असलेले गुन्हेगार आता … Read more

सर्व बँकांनी कर्ज वाटप करून उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे : डॉ. सुहास दिवसे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्याचा एकूण पतपुरवठा ३ लाख १ हजार ६०० कोटीचा असून त्यानुसार सर्व बँकांनी कर्ज वाटप करून जिल्ह्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय पतपुरवठा आढावा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक डॉ. जावेद मोहनवी, रिझर्व्ह … Read more

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी सकल मराठा समाजाचे निवेदन

तपास जलद गतीने पूर्ण करून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : सकल मराठा समाज, भूम तालुक्यातील सक्रिय आंदोलकांनी संतोष पंडीतराव देशमुख यांच्या निघृण हत्येप्रकरणी तपास जलद गतीने पूर्ण करण्याचे व संबंधित आरोपींना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सादर केले आहे. संतोष पंडीतराव देशमुख (रा. मस्साजोग, ता. केज, जि. बीड) … Read more