आवृत्ती , पुणे

कचरा डेपोतील बायोमायनिंग प्रकरणाची होणार चौकशी

पुणे महापालिका आयुक्तांनी दिला आदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उरुळी देवाची – फुरसुंगी कचरा डेपोतील जैविक उत्खननाच्या (बायोमायनिंग) निविदा प्रकरणाची महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी चौकशी करावी, आणि या निविदेतील आर्थिक बाबींसंदर्भात मुख्य लेखा परीक्षकांनी अहवाल सादर करावा, असा आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे बायोमायनिंगची निविदा काढण्यात … Read more

माता-पित्याच्या ऋणात राहण्यातच खरा आनंद: विठ्ठलशेठ मणियार

बन्सी-रत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे ऍड. एस. के. जैन कुटुंबास ‘आदर्श परिवार’ : लुंकड दाम्पत्यास ‘आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “आई वडिलांचे संस्कार, त्याग, समर्पण यातून आपली जडणघडण होते. समाजाचाही त्यात वाटा असतो. पण माता-पित्याचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. त्यांच्या ऋणात राहण्यातच खरा आनंद आहे. आपल्या मातापित्याचा समाजाचा विसर पडू न … Read more

बोपदेव घाटातील आरोपी गेले तरी कुठे ?

माहिती देणाऱ्यास पोलीसांकडून दहा लाखांचे बक्षीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेला सहा दिवस उलटले असतानाही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींची कसून चौकशी केली आहे. पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे जाहीर केली असून, त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. … Read more

भरधाव डंपरने मुलीला चिरडले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोथरुड स्टँड येथे बुधवारी सकाळी भरधाव डंपरने मुलीला चिरडले. गजबजलेल्या रस्त्यावरून जाण्यासाठी रस्ता क्रॉस करण्यासाठी तिने डीवायडर वरून उडी मारली आणि तिच्या डोक्यावरून डंपर गेला.तिचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अनधिकृत बांधकामाप्रकरणी आता थेट गुन्हे नोंदवणार

पीएमआरडीए कडून लोणीकंदमध्ये पाच जणांवर गुन्हे दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हवेली तालुक्यातील लोणीकंद भागातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाच जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. संबंधित अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत त्यांना काही दिवसांपूर्वी नोटीस देण्यात आली होती. परंतु त्याचे पालन न झाल्यामुळे पीएमआरडीए कडून आता धडक कारवाई होत असून, सोमवारी (दि.७ ऑक्टोबर … Read more

पुणे महापालिकेसमोर काँग्रेसचे आमरण उपोषण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेतील करोडो रुपयांच्या होत असलेल्या भ्रष्ट कामाच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व व्यापारी सेलच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या बाहेर आमरण उपोषण करण्यात येत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते भरत सुराणा हे या उपोषणासाठी बसलेले आहेत. या उपोषणामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड यांनी देखील सहभाग नोंदवला.

खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

युनिट-३ गुन्हे शाखा पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खंडणीच्या गुन्ह्यातील १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात भारती विद्यापीठ पोलीस आणि युनिट-३ गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ मे २०२३ रोजी खंडणी उकळण्याच्या उद्देशाने गाडी अडवून फिर्यादींना गाडीमधून खाली उतरवून चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण करत ५० … Read more

सांकेतिक भाषा व कर्णबधिर दिन उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पथनाट्याचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : जागतिक सांकेतिक भाषा दिन आणि जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात दिव्यांग भवन येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या जनजागृतीपर पथनाट्याने झाली. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनापासून दिव्यांग भवन फाऊंडेशनपर्यंत जनजागृती फेरी काढण्यात … Read more

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सुलाखे हायस्कूल अजिंक्य

विराट भिसे सामनावीर तर प्रणव जाधवर उत्कृष्ट गोलंदाज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : मोडनिंब येथे रविवारी (दि. ६) पार पडलेल्या मुलांच्या १४ वर्षाखालील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत बार्शीच्या सुलाखे हायस्कूल संघाने अकलूजच्या संघावर मात करत अजिंक्यपद मिळवले. अंतिम सामन्यात विराट भिसे सामनावीर तर प्रणव जाधवर उत्कृष्ट गोलंदाज ठरला. या विजयासह संगमनेर येथे होणाऱ्या … Read more

सोलापूर पोलिसांनी युवकाला गावठी कट्ट्यासह पकडले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी एका युवकाला पकडले असून, त्याच्याकडून 40,000/- रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात अनुचित प्रकार होऊ नयेत, यासाठी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस … Read more