खडक पोलिसांची कामगिरी : पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कंबरेला पिस्टल लावून फिरणाऱ्या आरोपीला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे असा एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत.
वसिम ऊर्फ लाल रशीद हजारी (वय ३८, रा. लोहियानगर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खडक पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, खडक व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार महात्मा फुले पेठेतील नेहरू रोड येथे थांबला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती केली असता त्याच्या कंबरेला ३५ हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल व तीन हजार रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्यावर बेकायदेशीर जमाव जमवून मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीष गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, विक्रम मिसाळ, पोलीस अंमलदार अजीज बेग, फहिम सैय्यद, संदीप पाटील, संदीप तळेकर, रवी लोखंडे, राहुल मोरे, हिंमत होळकर, कल्याण बोराडे, विशाल जाधव, सागर घाडगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.














