खडी मशिन परिसरात कोंढवा पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा पोलिसांनी खडी मशिन परिसरात कारवाई करीत मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलाना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून ९ गुन्हे उघड झाले असून ३,६०,०००/- रु किमतीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांनी सुचना दिल्या होत्या. सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे व त्यांचे पथक पेट्रोलींग करीत होते.
पोलीस अंमलदार राहुल थोरात, सुहास मोरे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, दोन मुले हे खडी मशीन चौक ते उंन्ड्री चौक दरम्यान असणाऱ्या पेट्रोल पंपाच्या गल्लीत काळ्या व निळ्या रंगाची पॅशन प्लस मोटार सायकल घेवुन उभे असुन त्याच्याकडील मोटार सायकलला नंबर प्लेट नाही. मोटार सायकल चोरीची असल्याबाबत संशय आहे.
पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. तेव्हा दोन मुले बंद पडलेली विना नंबर प्लेट मोटार सायकल सुरु करित होते. त्यांना ताब्यात घेवुन नाव व पत्ता विचारता ते विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे लक्षात आले.
त्याच्याकडे मिळुन आलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता ते उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले तेव्हा त्यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाण्यास आणुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याच्या ताब्यात मिळुन आलेली पॅशन मोटार सायकल ही काकडे पॅलेस कर्वेनगर येथुन चोरी केली असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता एकुण ०९ गुन्हे उघड होवुन ३,६०,०००/-रु किमतीच्या मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिंगोळे, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, सुहास मोरे, राहुल थोरात, अभिजीत जाधव, राहुल रासगे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, विकास मरगळे, मयुर मोरे, अक्षय शेंडगे, अनिल बनकर यांनी केली आहे.