महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र विद्यालय येथे दिनांक २१ डिसेंबर, शनिवार रोजी आंतरराष्ट्रीय ध्यान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक श्री. अनंत शहाणे आणि सहकारी श्री. स्वप्निल जिलपे यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम व ध्यान याचे महत्त्व सांगून त्याचे तंत्र शिकवले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के.डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक एस.सी. महामुनी, पर्यवेक्षिका एन.बी. साठे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या विशेष दिवशी विद्यार्थ्यांना मानसिक शांतता आणि शारीरिक ताजेतवानेपणासाठी ध्यानाचे महत्त्व पटवून दिले गेले. ध्यानाचा सराव करून विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी मानसिक बळ मिळवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी आणि आर्ट ऑफ लिव्हिंग टीमने सहकार्य केले.
