काही पोलीस निरीक्षकांच्या महिन्याच्या आत पुन्हा बदली
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर पोलीस दलातील १२ पोलीस पुन्हा बदल्या केल्या आहेत. चार गुन्हे निरीक्षकांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्याचवेळी चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. काही पोलीस निरीक्षकांची तर अवघ्या महिनाभराच्या आत पुन्हा बदली करण्यात आली आहे. मुंबई, लोहमार्ग येथून पुणे शहर पोलीस दलात बदली झालेल्या पोलीस निरीक्षक अलका सरग यांची बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे..

